Political News : लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार भाजपसोबत बिहारमध्ये सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. या सगळ्यात घडामोडीत शेवटचे प्रयत्न म्हणून लालू प्रसाद यादव यांच्याकडून तब्बल पाच वेळा नितीश कुमार यांना फोन केला. मात्र, नितीशकुमार यांनी फोन घेतला नाही. नितीशकुमार लालू यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याचे संकेत आहेत. भाजपच्या मदतीने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील. तर भाजपला उपमुख्यमंत्री पद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडिया आघाडी स्थापन करण्यात नितीशकुमारांचा मोठा वाटा होता. इंडिया आघाडीचे संयोजक पद त्यांना मिळेल, अशी देखील त्यांची अपेक्षा होती. मात्र, दिल्लीत इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीनंतर त्यांचे इंडिया आघाडीसोबत अंतर वाढले होते. त्यात बिहारमध्ये आरजेडीकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत होता. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते. Lalu Prasad Yadav call Nitish Kumar
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नितीशकुमार आरजेडीची साथ सोडणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपकडून बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. नितीश कुमार यांच्यासोबत जाताना प्रादेशिक नेतृत्वाने घाई करू नये, अशी सूचना देखील केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आली होती. दरम्यान, भाजपसोबत जाणे ही नितीनकुमार यांची राजकीय आत्महत्या असेल,अशी टीका आरजेडीकडून करण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी साथ सोडली तर सत्तेत कायम राहण्यासाठी आरजेडीकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे.
भाजपची साथ सोडून आरजेडीसोबत नितीशकुमार यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपकडून नितीशकुमार यांना टार्गेट करण्यात येत होते. नितीशुकमार यांना पुन्हा एनडीएमध्ये घेणार नाही, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने भाजपला नितीशकुमार यांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. कारण बिहारमधून लोकसभेच्या तब्बल 40 जागा आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा लवकरच बिहारमध्ये येणार आहे. ही यात्रा बिहारमध्ये येण्याच्या आधीच नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि भाजपचे सरकार स्थापन झालेले असेल. इंडिया आघाडीची साथ सोडून लोकसभा निवडणुकीच्या आधी एनडीएमध्ये जात असल्याने हा राहुल गांधीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.