नाशिक : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) व्हावेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केले होते. त्यानंतर आता आमदार राजू नवघरे यांनीही तसेच विधान केले आहे. त्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले आहे. (Sharad Pawar's comment on Ajit Pawar's Chief Ministership....)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमच्यातील काहींची इच्छा आहे. परंतु त्यासाठी संख्याबळ असलं पाहिजे ना. आज आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठीचे संख्याबळ नाही. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्यातील सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठीची शक्ती नाही. संख्या नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही.
शरद पवार हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार हे बोलत होते. पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि त्यानंतर राजू नवघरे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केल्याने राज्यात त्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढलेल्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा मुंबईला येऊन गेले, तर गृहमंत्री अमित शहा हे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी येत असतील तर आमच्या कार्यकर्त्यांचे काम चांगले चालेले आहे, असे मानायला हरकत नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर मोदी मुंबईत येत आहेत. काही हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असा टोलाही पवार यांनी मोदींना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.