

Crude oil tanker Mumbai : इस्त्राईल आणि अमेरिकेकडून इराणवर बॉम्ब, क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला जात आहे. त्याचा विपरीत परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाद्वारे सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असताना कच्चा तेलाने भरलेले एक जहाज मुंबईच्या बंदरात दाखल झाल्याने भारताला दिलासा मिळाला आहे.
युध्द सुरू झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारताच्या सीमेवर येणारे हे पहिले जहाज ठरले आहे. आज इराणने भारताचा झेंडा असलेल्या जहाजांना सामुद्रधुनीमार्गे जाण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, त्याआधीच बुधवारी एक जहाज मुंबईत आले. 'Shenlong Suezmax' चे हे जहाजावर लायबेरियाचा झेंडा आहे. मात्र, त्याची कमान भारतीय कॅप्टनच्या हाती होती.
कच्च्या तेलाचे हे जहाज सौदी अरेबियातील रास तनूर बंदरातून १ मार्च रोजी भारताच्या दिशेने निघाले होते. पुढे होर्मुझ सामुद्रधुमीमागे हे जहाज सुरक्षितपणे भारताच्या सीमेत दाखल झाले. इराणकडून या जहाजाला परवानगी देण्यात आली होती. इराणकडून परवानगीशिवाय जहाजांना मार्गक्रमण न करण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून संवाद साधला आह. त्यानंतर भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पुढे जाण्यात परवानगी देण्यात आली आहे. अजूनही सुमारे २८ जहाज आणि ७७८ नाविक त्याठिकाणी अडकले आहेत. या जहाजांपैकी २४ जहाज होर्मुझच्या पश्चिमी भागात तर ४ जहाज पूर्व भागात आहेत.
भारताने बुधवारी स्पष्ट केले होते की, सर्व जहाजांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. सर्व भारतीय जहाज आणि नाविकांसाठी सतर्कतेचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबाजवणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम कार्यरत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.