New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर होण्याआधीच आम आदमी पक्षाने दिल्लीत आघाडी घेतली आहे. आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. आपच्या वाट्याला दिल्लीत चार जागा आल्या असून आज चारही उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आपने आपल्या आमदारांवर भरवसा दाखवला आहे.
आपने (AAP) लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलेल्या चार उमेदवारांपैकी तिघे आपचे विद्यमान आमदार आहेत. नवी दिल्लीतून सोमनाथ भारती (Somnath Bharti), पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार आणि दक्षिण दिल्लीतून सहीराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिश्रा वगळता इतर तिघेही विद्यमान आमदार आहेत.
महाबल मिश्रा हे काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 2022 मध्ये आपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. पश्चिम दिल्लीचे ते खासदार राहिले आहेत. त्यामुळे आपकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच यापुर्वी ते द्वारका मतदारसंघाचे तीनदा आमदार होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपकडून आज हरयाणातील कुरूक्षेत्र या मतदारसंघातील उमेदवाराचीही घोषणा केली. याठिकाणी सुशील गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या राज्यातही काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी झाली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांची गुजरातमध्येही आघाडी झाली असून आपच्या वाट्याला भरूच आणि भावनगर हे मतदारसंघ आले आहेत. दोन्ही ठिकाणी यापूर्वीच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री व आपचे नेते गोपाल राय यांनी सांगितले की, इंडिया आघाडीसाठी (India Alliance) विजय मिळवून देणाऱ्या उमेदवारांनाचा तिकीट दिले आहे. पक्षाने आतापर्यंत विविध राज्यांतील दहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंजाबमधील उमेदवारांची लवकरच घोषणा केली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.