Lok Sabha Election 2024 : साहेब, बीवी और गँगस्टर..! लोकसभा निवडणुकीची ही ‘स्क्रीप्ट’ वाचली का?

Political News : बिहारच्या राजकारणात गॅंगस्टर, बाहुबली असे शब्द सातत्याने ऐकायला मिळतात. या निवडणुकीतही अशा नेत्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.
Heena Shahab, Anita Devi
Heena Shahab, Anita DeviSarkarnama

Bihar News : देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) चांगलीच रंगात आली आहे. तीन टप्पे पूर्ण झाले असून उर्वरित चार टप्प्यांसाठीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत काही मतदारसंघ राजकीय पक्षांसह नेत्यांसाठीही आव्हानात्मक बनले आहेत. त्यापैकी बिहारमधील सीवान आणि मुंगेर हे दोन मतदारसंघ आहेत. ‘साहेब, बीवी और गँगस्टर’, अशीच लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघात कुख्यात गॅंगस्टरच्या पत्नी मैदानात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार बनली आहे.

बिहारमधील (Bihar) सीवान लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) माजी खासदार, गॅंगस्टर मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी रिंगणात आहेत. हा मतदारसंघ शहाबुद्दीन यांचा गड मानला जातो. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी हिना शहाब (Heena Shahab) निवडणुकीत उभ्या आहेत. राजदच्या विनंतीनंतरही त्या अपक्ष मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) चिंता वाढली आहे.

Heena Shahab, Anita Devi
Lok Sabha Election 2024 : सॅम पित्रोदांचा पुन्हा ‘फुलटॉस’; मोदींचे तडाखे अन् काँग्रेस ‘बॅकफूट’वर

शहाबुद्दीन यांना सीवानमध्ये साहेब म्हणून ओळखले जायचे. सीवान मतदारसंघाचे त्यांनी चारवेळा संसदेत (Parliament) नेतृत्व केले आहे. अनेक प्रकरणांमध्ये कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी पत्नीला राजदच्या तिकीटावर मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये (Election) मैदानात उतरवले होते. पण त्यांचा पराभव झाला. 2021 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हिना या राजदपासून दुरावल्या. राजदने त्यांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला, पण हिना यांनी तिकीट नाकारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंगेर लोकसभा मतदारसंघात गँगस्टर अशोक महतो याची पत्नी अनिता देवी मैदानात आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने त्यांना तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने माजी अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांना तिकीट दिले आहे. मुंगेर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो.

2019 मध्ये मुंगेर मतदारसंघात राजदने गँगस्टर आणि माजी आमदार अनंत सिंहच्या पत्नी नीलम देवी यांना मैदानात उतरवले होते. नीलम देवी यांचा एक लाखांनी पराभव झाला. त्यानंतर 2022 मध्ये काही गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्यानंतर अनंत सिंहची आमदारकी गेली. पोटनिवडणुकीत नीलम देवी यांनी भाजपचा पराभव करत विजय मिळवला. आता त्या मुंगेरमध्ये ‘एनडीए’चा प्रचार करत आहेत.

Heena Shahab, Anita Devi
PM Narendra Modi : मोदींचा अदानी-अंबानींचे नाव घेत काँग्रेसवर वार; म्हणाले, किती माल उचलला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com