Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये भाजपनं डाव साधला; नितीश कुमारांना टाकलं मागे

BJP Political News : भाजप आणि संयुक्त जनता दलाने 2019 मध्ये प्रत्येकी 17 जागा लढवल्या होत्या. या वेळी नितीन कुमारांच्या पक्षाला 16 जागा मिळाल्या आहेत.
Chirag Paswan, Amit Shah, Nitish kumar
Chirag Paswan, Amit Shah, Nitish kumarSarkarnama

Bihar News : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला सोबत घेऊन भाजपने चांगलाच जम बसवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळूनही भाजपने नितीश कुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडली अन् काही महिन्यांत पुन्हा सोबत आले. त्यानंतरही भाजपने त्यांनाच मुख्यमंत्री केले. पण एक पाऊल मागे घेत भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) नितीश कुमारांना आता पिछाडीवर टाकले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. बिहारमधील एनडीएच्या (NDA) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानंतर राज्यात भाजप (BJP) 17, तर जेडीयू (JDU) 16 जागा लढवणार आहे. चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोक जनशक्ती पक्षाला पाच जागा देण्यात आल्या आहेत.

Chirag Paswan, Amit Shah, Nitish kumar
One Nation One Election : लोकसभा, विधानसभेची निवडणूक एकाचवेळी? राष्ट्रपतींना 18 हजार पानांचा अहवाल सादर

उपेंद्र कुशावाह आणि जीतन राम मांझी यांना प्रत्येकी एक जागा दिली आहे. राज्यात 40 जागांचे गणित सोडवताना भाजपने तारेवरची कसरत केली असली तरी नितीश कुमारांपेक्षा एक जागा जास्त घेत भविष्यातील राजकारणाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. एनडीएमध्ये पासवान यांचे महत्त्व वाढवून भाजपने थेट नितीश कुमारांना (Nitish Kumar) इशारा दिल्याचीही चर्चा आहे.

चिराग पावसान आणि भाजपमध्ये जागावाटपावरून चर्चेचे घोडे अडले होते. यातच विरोधकांनी त्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. पण भाजपने पासवान यांना जाऊ दिले नाही. त्यांच्याशी पाच जागांवर तडजोड केली. त्यामध्ये नितीश कुमारांना एका जागेचा फटका बसला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि जेडीयूमध्ये 40 जागांमध्ये 50-50 टक्के वाटा ठरवण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही पक्ष प्रत्येकी १७ जागांवर लढले, तर पासवान यांना सहा जागा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी पासवानांच्या पक्षात फूट पडली नव्हती. आता पक्ष फुटूनही त्यांनी पाच जागा मिळवल्या आहेत, तर त्यांचे काका पशुपती पारस यांना एकही जागा मिळालेली नाही.

भाजपने पासवान यांना दिलेले महत्त्व आणि जेडीयूपेक्षा एक जागा जास्त मिळवून राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील पक्षाची ताकद वाढवून नितीश कुमारांचा दबाव जुगारून टाकत एकहाती सत्ता मिळवण्याच्यादृष्टीने भाजपची ही कूटनीती महत्त्वाची मानली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

R

Chirag Paswan, Amit Shah, Nitish kumar
Election Commissioner News : काँग्रेस नेत्यानं फोडली नव्या निवडणूक आयुक्तांची नावं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com