New Delhi News : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. विविध पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपकडून प्रामुख्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांना लक्ष्य करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांच्या बहुतेक भाषणांत राहुल यांचा उल्लेख असतो. तर काँग्रेसचे पानही राहुल यांच्याशिवाय हलताना दिसत नाही. त्यातच भाजपने राहुल यांना ‘बेस्ट फिनिशर’ची उपाधी देऊन टाकली.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसमधून (Congress) अनेक नेते बाहेर पडत असल्याचा उल्लेख केला. मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरातील अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी हे विधान केले.
राजनाथ सिंह म्हणाले, मला काहीवेळा आश्चर्य वाटते की, हे काय होत आहे. आता मी एका निष्कर्षापर्यंत पोहचलो आहे. क्रिकेटमध्ये ‘बेस्ट फिनिशर’ कोण आहे? धोनी. भारतीय राजकारणातील बेस्ट फिनिशर कोण, असे मला कुणी विचारले तर मी म्हणेन राहुल गांधी. या कारणामुळेच काँग्रेसला अनेक नेते रामराम ठोकत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस आणि भ्रष्टाचाराचे नाते अतुट असल्याचे सांगत सिंह म्हणाले, काँग्रेसच्या प्रत्येक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाही मंत्र्यांवर असे आरोप झाले नाहीत. कधीकाही देशात केवळ काँग्रेसचा दबदबा होता. आज केवळ दोन किंवा तीन छोट्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.
दरम्यान, काँग्रेसने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यावरही सिंह यांच्यासह भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसने दिलेली आश्वासने खोटी आणि भ्रम पसरवणारी असल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान मोदी काल म्हणाले की, काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषित, तरुणांचा विचार केला नाही आणि गरिबांचाही विचार केला नाही. काँग्रेस हा केवळ घराणेशाही करणारा आणि भ्रष्टचारात बुडालेला पक्ष आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा विचार आहे, असा घणाघात मोदींनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.