Lok Sabha Election 2024 : ‘चौकीदार’नंतर आता ‘मोदी का परिवार’ची लाट; गडकरी, फडणवीसांसह अनेकांची साथ...

Modi Ka Pariwar : नरेंद्र मोदी यांचे कुटुंब नाही. तुमच्या कुटुंबात मुलं का नाहीत, हे सांगा, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली होती.
Modi Ka Pariwar
Modi Ka PariwarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या विधानाने राजकारण ढवळून निघालं आहे. लालूंच्या या वक्तव्यालाच भाजपने शस्त्र बनवून राजकीय डाव टाकला आहे. 

2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) ‘मै हूँ चौकीदार’ ही घोषणा दिली होती. तर काँग्रेसने (Congress) ‘चौकीदारही चोर है’ म्हणत भाजपला घेरलं होतं. यावेळी भाजपचे सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातील (Social Media) आपल्या नावापुढे ‘मै हूँ चौकीदार’ हे शब्द जोडले होते. आता 2024 च्या निवडणुकीतही (Election) अशीच सुरूवात झाली असून यावेळचा नारा मात्र वेगळा आहे.

Modi Ka Pariwar
Chandigarh Deputy Mayor Election : अखेर भाजपला विजय मिळालाच; प्रत्यक्ष मतदानात आप-काँग्रेसला दणका...

कुटुंबावरून लालूंनी केलेल्या विधानाचा पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) आज तेलंगणातील सभेत समाचार घेतला. देशातील 140 कोटी जनता माझे कुटुंब आहे. माझा देशच माझे कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी एक्स हँडलवरील आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुकीत भाजपकडून आता प्रचारातही याचा जोरदारपण वापर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची प्रचिती मोदींनी आजच्या सभेत दिली. मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियात जणू ‘मोदी का परिवार’ची लाटच आली आहे. महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी हा बदल केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भ्रष्टाचार, घराणेशाही, ध्रुवीकरणमध्ये बुडालेल्या विरोधी पक्षातील नेते काहीही बरळत आहेत. त्यांनी 2024 चे घोषणापत्र काढले आहे. मी त्यांच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मोदींचे कुटुंब नाही, असे बोलायला लागले. देशवासिय मला चांगल्याप्रकारे ओळखतात, समझतात. माझ्या प्रत्येक क्षणाची खबर देशाला आहे. 140 कोटी देशवासीय माझे कुटुंब आहे. देशातील तरूण, महिला, गरीब, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले हे सर्व माझे कुटुंब आहे. माझा भारतच, माझे कुटुंब आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

Modi Ka Pariwar
Lok Sabha Election 2024 : हायकोर्टाचे न्यायाधीश राजीनामा देऊन येणार राजकारणात; भाजपमध्ये करणार प्रवेश?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com