Lok Sabha Election 2024 : भाजपने दोन याद्यांमध्ये 67 खासदारांना दाखवला घरचा रस्ता; बड्या नेत्यांचा समावेश

BJP Candidates List : भाजपने आतापर्यंत 267 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली आहे. काल 72 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची घोषणा करण्यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्यांमध्ये 267 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच काही नवीन चेहऱ्यांनाही भाजपने संधी दिली असून, अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

भाजपने (BJP) जाहीर केलेल्या 267 नावांपैकी 140 उमेदवार हे विद्यमान खासदार आहेत. या यादीमध्ये पक्षाने 21 टक्के विद्यमानांना घरी बसवल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील अनेक भागात सत्ताविरोधी लाट असल्याची चर्चा आहे. खासदारांविषयी असलेली स्थानिक नाराजीचा फटका बसू नये, या उद्देशाने भाजपने अनेक खासदारांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) खासदारांचाही समावेश आहे.

BJP
BJP Second Candidate List: भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र, 'या' नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत देशात 370 जागांचे टार्गेट ठेवले आहे, तर एनडीएसाठी 400 हून अधिक जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपकडून जवळपास 70 अधिक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांनी संधी दिली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने उमेदवारांची पहिली यादी दोन मार्चला जाहीर केली. 195 जणांच्या या यादीत 33 विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली नाही. त्यामध्ये प्रज्ञा ठाकूर, रमेश बिथूडी, गौतम गंभीर, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आदी नेत्यांचा समावेश आहे. दिल्लीतील सहा खासदारांना (MP) घरी बसवण्यात आले आहे. भाजपने दुसऱ्या 72 उमेदवारांच्या यादीतूनही 30 खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.

दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, तर गुजरातमधील सात, तेलंगणा आणि हरियाणाताली प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश पाच, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी दोन आणि दादरा व नगर हवेलीतील एका उमेदवाराचे नाव आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. कर्नाटकात 11 खासदारांना बदलण्यात आले आहे.

R

BJP
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘इंडिया’च्या आशेचा ‘चिराग’ विझला; भाजपचं मित्रपक्षानं ऐकलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com