Amit Shah, Sam Pitroda
Amit Shah, Sam PitrodaSarkarnama

Lok Sabha Election 2024 : सॅम पित्रोदांनी काँग्रेसला पुन्हा आणलं अडचणीत; अमित शाह कडाडले...

Sam Pitroda Controversy News : काँग्रेसकडून देशातील लोकांची संपत्ती घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांना वाटली जाणार असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यावर पित्रोदा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ देत वाद ओढवून घेतला आहे.

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून जोरदार शरसंधान साधत आहेत. काँग्रेसकडून लोकांची संपत्ती घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांना वाटली जाणार असल्याची टीका ते करत आहेत. त्यावरून काँग्रेसनेही पलटवार केला.

पण आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपने पुन्हा एकदा हा मुद्दा लावून धरत काँग्रेसला धारेवर धरले आहे.

काँग्रेस नेते (Congress) सॅम पित्रोदा यांनी वारसाहक्क कराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सत्तेत आल्यानंतर सर्व्हे करून कुणाकडे किती संपत्ती आहे, याची माहिती घेतली जाईल. त्यावर प्रतिक्रिया देताना पित्रोदा यांनी अमेरिकेतील (America) वारसाहक्क कराबाबत (Inheritance Tax) वक्तव्य केलं आहे.

Amit Shah, Sam Pitroda
Lok Sabha Election 2024 : माझ्या 90 सेकंदांच्या भाषणाने काँग्रेस अन् आघाडी घाबरली! मोदींचा पुन्हा हल्लाबोल

अमेरिकेमध्ये वारसाहक्क कर असल्याचे सांगत पित्रोदा म्हणाले, एखाद्या व्यक्तीकडे दहा कोटी डॉलरची संपत्ती असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर 45 टक्के संपत्ती मुलांना दिली जाते. त्यानंतर उरलेली 55 टक्के संपत्ती सरकारच्या मालकीची होती. हा कायदा मला पटतो. ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, ते गेल्यानंतर जनतेसाठी काही संपत्ती सोडावी लागते. भारतात (India) असा कुठलाही कायदा नाही. अशा मुद्द्यांवर लोकांनी चर्चा करायला हवी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केवळ श्रीमंत नव्हे तर सर्व लोकांच्या हिताच्या मुद्द्यांवर आम्ही बोलत आहोत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही श्रीमंतांची संपत्ती वाटण्याचा उल्लेख नाही. त्यामध्ये असे म्हटले आहे की, असे धोरण आणले जाईल, ज्यामुळे संपत्तीचे समान वाटप होईल. श्रीमंत लोक नोकरांना पुरेसे वेतन देत नाहीत, पण तेच पैसे दुबई, लंडनमध्ये जाऊन खर्च करतात, असे आज होत आहे, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.

अमित शाहांची टीका

अमित शाह (Amit Shah) यांनी पित्रोदा यांच्या विधानावरून पुन्हा काँगेसला घेरले आहे. काँग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा, मनमोहन सिंग यांचे अल्पसंख्याबाबतचे यापूर्वीचे विधान आणि आता सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या विधानामुळे काँग्रेसचे धोरण देशासमोर आले आहे.

काँग्रेसने एकतर जाहीरनाम्यातून हा मुद्दा काढून टाकावा किंवा आपले धोरण मान्य करावे. लोकांनी पित्रोदा यांचे विधान गांभीर्याने घ्यायला हवे. काँग्रेसचा हेतू स्पष्ट असून त्याची दखल लोकांनी घ्यायला हवी, असे शाह म्हणाले.  

R

Amit Shah, Sam Pitroda
Lok Sabha Election 2024 : अखिलेश लालूंना देणार धक्का? जावयाच्या तिकिटावर टांगती तलवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com