New Dehi News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना आज काँग्रेसला धक्का बसला आहे. देशभरात प्रचारसभांचा धडाका सुरू असलेले पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. झारखंडमधील इंडिया आघाडीच्या सभेलाही ते उपस्थित राहणार नाहीत. ते दिल्लीच्या बाहेर पडू शकत नसल्याची माहिती पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.
जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ‘एक्स’वरून राहुल यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) आज सतना आणि रांची येथील निवडणूक प्रचारासाठी पूर्णपणे सज्ज होते. रांचीमध्ये इंडिया आघाडीची (India Alliance) सभा होत आहे. पण ते अचानक आजारी पडल्याने सध्यातरी दिल्लीच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे सतना येथील सभा आणि रांचीतील सभेलाही उपस्थित राहणार असल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले होते. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत राहुल यांची तब्येत बिघडली आहे. सोमवारच्या प्रचारसभांबाबत जयराम रमेश यांनी काहीही माहिती दिलेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज रांचीत शक्तीप्रदर्शन
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधीच्या पहिल्या रविवारी इंडिया आघाडीकडून झारखंडमध्ये शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आघाडीची एकत्रित सभा रांचीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेला न्याय सभा असे नाव देण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्याविरोधात काही दिवसांपुर्वी दिल्लीतही इंडिया आघाडीची सभा झाली होती. त्यानंतर आता रांचीमध्ये सभा होत आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ईडीने अटक केली आहे. या सभांच्या माध्यमातून इंडिया आघाडीकडून दोन्ही नेत्यांच्या अटकेविरोधात मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.