Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘एनडीए’ला धक्का; खासदारांनी सोडली पासवानांची साथ

MP Mehboob Ali Kaiser : मेहबूब अली यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर लगेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Mehboob Ali Kaiser Chirag Paswan
Mehboob Ali Kaiser, Chirag PaswanSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असतानाच भाजपप्रणित एनडीएला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. एनडीएतील राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (पासवान) खासदार महबूब अली कैसर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश केल्याने इंडिया आघाडीची ताकद वाढली आहे.

आरजेडीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या उपस्थितीत महबूब अली यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. महबूब यांचे पुत्र युसूफ सलाउद्दीन हे यापुर्वीच यादव यांच्यासोबत आले आहेत. आरजेडीमध्ये (RJD) आल्यानंतर महबूब यांच्यावर लगेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Mehboob Ali Kaiser Chirag Paswan
Doordarshan New Logo : 'प्रसारभारती आता 'प्रचारभारती' ; दूरदर्शनाचा लोगो भगवा झाल्यावरून विरोधकांची टीका!

महबूब हे खगरिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. ते पक्षात आल्याने या मतदारसंघासह अनेक मतदारसंघात पक्षाला बळकटी मिळणार आहे. मागील दहा वर्षांत बिहारमध्ये एनडीएतून निवडून आलेले महबूब हे एकमेव मुस्लिम खासदार होते. त्यामुळे एनडीएसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना तेजस्वी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, एकीकडे पेन वाटणारे तर दुसरीकडे तलवार वाटणारे नेते आहेत. दक्षिण भारतात सुरू असलेल्या हवेमुळे दक्षिण बिहारमध्येही एनडीएचा सफाया झाला आहे. पहिल्या टप्प्यातील चार जागांवर आमचा विजय होईल. इतर सहा टप्प्यांमध्येही आश्चर्यकारक निकाल येतील. संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्यांना बिहारच जनता धडा शिकवेल.

महबूब अली म्हणाले, लालूप्रसाद यादव यांचे मन मोठं आहे. मी राबडी देवी सरकारमध्ये मंत्री होतो. आज खऱ्याअर्थाने माझी घरवापसी झाली आहे. तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री असताना चांगले काम केले. लालूंनी सामाजिक न्यायाची लढाई लढली तर तेजस्वी यांनी आर्थिक न्यायाचा नारा दिला. मी एनडीएमध्ये होतो. माझे तिकीट का कापले, काही कळत नाही.

मागील दहा वर्षांत निवडणूक जिंकून लोकसभेत जाणार मी एनडीएतील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्यांना आता आमच्या मतांची गरज नाही, असे वाटत आहे. मी गद्दारी केलेली नाही. रामविलास पासवान यांच्यानंतर पक्ष आणि कुटुंबातील वरिष्ठांसोबत मी होतो. गद्दारी तर चिराग पासवान यांनी 2020 मध्ये भाजपसोबत केली, अशी टीका महबूब यांनी चिराग यांच्यावर केली.

Mehboob Ali Kaiser Chirag Paswan
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com