Lok Sabha Election 2024 : पल्लवी पटेलांनी वाढवली अखिलेश यांची डोकेदुखी; तीन उमेदवार जाहीर

Pallavi Patel News : पल्लवी पटेल या राज्यसभा निवडणुकीपासून अखिलेश यांच्यावर नाराज आहेत. आईला तिकीट मिळावे, यासाठी त्या आग्रही होत्या. त्यांनी जया बच्चन यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
Pallavi Patel, Akhilesh Yadav
Pallavi Patel, Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) जागावाटप झाले असले तरी अजूनही डोकेदुखी कमी झालेली नाही. इंडिया आघाडीतील अपना दल (कमेरावादी) पक्षाच्या नेत्या पल्लवी पटेल यांनी दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे. पटेलांनी तीन जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, याबाबत सपा आणि काँग्रेससोबत कसलीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले आहे.

पल्लवी पटेलांनी (Pallavi Patel) फुलपूर, मिर्झापूर आणि कौशाम्बी मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा कृष्णा पटेल यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खूप दिवसांपासून आहोत. त्यांच्या प्रत्येक बैठकीत आम्ही सहभागी झालो. आम्ही त्यांच्यासोबत असून, त्यानुसार तीन जागांची घोषणा करत आहोत.

Pallavi Patel, Akhilesh Yadav
Congress News : काँग्रेसकडून तीन राज्यांत भाजपला झटका; आमदार, माजी मंत्र्यांचा पक्षप्रवेश

ही घोषणा झाल्यानंतर समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) नेत्यांनी चुप्पी साधली आहे. अद्याप पक्षाच्या नेतृत्वाकडून काहीच सूचना आलेल्या नाहीत. जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पल्लवी पटेल या राज्यसभा निवडणुकीपासून (Rajya Sabha Election) नाराज आहे. कृष्णा पटेल या त्यांच्या आई असून, त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळावे, यासाठी त्या अखिलेश यादव यांच्याकडे आग्रही होत्या, पण सपाने जया बच्चन (Jaya Bacchan) यांच्यासह इतरांना संधी दिली. बच्चन यांच्या उमेदवारीला पटेल यांनी कडाडून विरोध करत त्यांना मत देणार नसल्याचे जाहीर केले होते.

पटेल यांच्या राज्याच्या काही भागात चांगली ताकद आहे. त्यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) नेते व माजी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांची नाराजी सपा आणि काँग्रेसला परवडणारी नाही, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप सपा आणि अपना दलमध्ये जागावाटपावर चर्चा झालेली नसताना पटेलांनी उमेदवार घोषित केल्याने वादाची ठिणगी पडली आहे.

R

Pallavi Patel, Akhilesh Yadav
Lok Sabha Election 2024 : पप्पू यादवांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; ‘इंडिया’ची ताकद वाढली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com