Congress News : दिल्लीत काँग्रेसला घरघर; अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर दोन माजी आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

Lok Sabha Election 2024 : दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांवरून नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. उमेदवारी देताना दिल्लीतील नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचा दावा केला जात आहे.
Congress
CongressSarkarnama

New Delhi : दिल्लीतील काँग्रेसची (Congress News) डोकेदुखी वाढतच चालली आहे. दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांवरून स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समोर आले आहे. तसेच अंतर्गत धुसफूसही बाहेर आली आहेत. दिल्ली अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दोन मतदारसंघाच्या निरीक्षकांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे दिल्ली काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

माजी आमदार नीरज बोसोया आणि नसीब सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. दोघांनीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kahrge) यांच्यासमोर पत्राद्वारे आपली नाराजी मांडली आहे. त्यांनी प्रामुख्याने उमेदवारांबाबतची नाराजी आणि आम आदमी पक्षाशी (AAP) केलेल्या आघाडीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

Congress
Delhi Schools on Alert : दिल्लीतील 50 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; शाळा केल्या रिकाम्या

बोसोया यांची पश्चिम दिल्ली लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आपशी केलेल्या आघाडीमुळे दिल्लीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची निराशा जाली आहे. आपला आत्मसन्मान दुखावल्याने मी पक्षासोबत राहू शकत नाही. त्यामुळे मी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. (Latest Political News)

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नसीब सिंह हे उततर पश्चिम दिल्ली मतदारसंघाचे निरीक्षक होते. त्यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविंदर यादव यांची नियुक्ती केल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, यादव हे पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोहिम राबवत होते. आता ते आप आणि त्यांचे कौतुक करत आहेत.

अरविंद सिंग लवली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर यादव यांची त्यांची जागी नियुक्ती करण्यात आली आहे. लवली यांनीही पक्षांतर्गत वाद आणि बाहेरील उमेदवारांचे कारण देत पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी पक्षातच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर दोन माजी आमदारांनी मात्र पक्षाला सोडचिठ्ठी देत धक्का दिला आहे.

Congress
Narendra Modi News: महाराष्ट्रातील नारी शक्तीला ‘लखपती दीदी’ बनवू!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com