Abhijit Gangopadhyay News : ममतांविषयी वादग्रस्त विधान भोवलं; निवृत्त न्यायाधीशांना निवडणूक आयोगाचा दणका

Lok Sabha Election 2024 : अभिजित गंगोपाध्याय यांना भाजपने तमलुक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी निवडणुकीआधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
Mamata Banerjee, Abhijit Gangopadhyay
Mamata Banerjee, Abhijit GangopadhyaySarkarnama

Mamata Banerjee News : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे पश्चिम बंगालमधील उमेदवार व निवृत्त न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay News) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आयोगाने गंगोपाध्याय यांना प्रचार करण्यास बंदी घातली आहे.

अभिजित गंगोपाध्याय यांच्याविषयी तृणमूल काँग्रेसने (TMC) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली असून त्यानुसार गंगोपाध्याय यांच्याविरोधात कारवाई केली आहे. आयोगाने (Election Commission) त्यांच्यावर 24 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली आहे. मंगळवारी (ता. 21) सायंकाळी पाच वाजल्यापासून पुढील 24 तास त्यांना प्रचार करता येणार नाही. (Lok Sabha Election 2024)

Mamata Banerjee, Abhijit Gangopadhyay
Bhimrao Ambedkar News : आंबेडकरांचे तिसरे नातूही लोकसभेच्या रिंगणात; थेट गाठले पंजाब...

आचारसंहितेच्या (Model Code of Conduct) काळात यापुढेही काळजीपुर्वक विधाने करण्याची ताकीदही आयोगाने गंगोपाध्याय यांना दिली आहे. टीएमसीने शुक्रवारी गंगोपाध्याय यांची आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांविषयी त्यांनी अश्लील विधान केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईबाबतही पावले उचलले जातील, असा इशारा बंगालचे मंत्री शशी पंजा यांनी दिला आहे. (Abhijit Gangopadhyay Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते गंगोपाध्याय?

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. पत्रात म्हटले होते की, गंगोपाध्याय यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘ममता बॅनर्जी तुम्ही किती किंमतीला विकल्या जाता? तुमचा रेट 10 लाख आहे, का? कारण तुम्ही तुमचा मेकअप केया सेठ यांच्याकडून करता? ममता बॅनर्जी, त्या महिला आहेत? काहीवेळा मला आश्चर्य वाटते’, असे विधान गंगोपाध्याय यांनी केले होते. (West Bengal CM Mamata Banerjee News)

निवडणूक आयोगाने मंगळवारी काढलेल्या आदेशामध्ये कडक ताशेरे ओढले आहेत. अभिजित गंगोपाध्याय यांनी आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन केली आहे. त्यांनी अत्यंत खालच्या पातळीची वैयक्तिक टीका केली आहे.  आयोगाने म्हटले आहे. आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाकडून उमेदवार व प्रचारकांना सुचना देण्यास सांगितले आहे. प्रचारकाळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यास आयोगाने सांगितले आहे.

Mamata Banerjee, Abhijit Gangopadhyay
Sambit Patra News : भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त! वादग्रस्त विधानानंतर संबित पात्रांचा आत्मक्लेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com