Lok Sabha Election 2024 : देवेगौडांचा खासदार नातू देश सोडून पळाला; व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरण भोवणार...

Prajwal Revanna News : प्रज्वल रेवन्ना हे बेंगलुरू येथून आज सकाळीच जर्मनीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. अश्लीस व्हिडीओ प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Prajwal Revanna, HD Deve Gowda
Prajwal Revanna, HD Deve GowdaSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातू व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका अश्लील व्हिडीओ प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने काल केली आहे. या प्रकरणात रेवन्ना यांचे नाव आल्याने ते देश सोडून पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हा देवेगौडा यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

रेवन्ना (Prajwal Revanna) हे आज सकाळी बेंगलुरू येथून जर्मनीतील फ्रँकफर्टला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकातील (Karnataka) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधीच रेवन्ना यांचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले होते. त्यानंतर सरकारने एसआयटी (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Prajwal Revanna, HD Deve Gowda
Congress News : दिल्लीत काँग्रेसला झटका; पक्षांतर्गत वादातून अध्यक्षांचा राजीनामा

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेवन्ना हे जर्मनीला रवाना झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेवन्ना यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. त्यानंतर एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सिध्दरामैया (Siddaramaiah) यांच्या कार्यालयाकडून याबाबतची माहिती दिली. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणाची सरकारने विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे त्यातून दिसते, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

रेवन्ना प्रकरणापासून भाजप (BJP) हात झटकले आहेत. भाजपचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते एस. प्रकाश यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी व्हायरल व्हिडीओवर बोलण्यासही नकार दिला आहे. विशेष म्हणजे देवेगौडा यांच्या पक्षाशी भाजपने युती केली आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

जेडीएसकडून आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. जेडीएसचे नेते पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नवीन गौडा आणि इतर काही लोकांना रेवन्ना यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात जेडीएसच्या अडचणी वाढल्या आहेत.

Prajwal Revanna, HD Deve Gowda
Lok Sabha Election 2024 : देवभूमीत भाजप ‘क्लीन स्वीप’ची हॅट॒ट्रिक साधणार की काँग्रेस कमबॅक करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com