Bhaskar Jadhav, Narendra Modi
Bhaskar Jadhav, Narendra ModiSarkarnama

Maharashtra Politics News: ...म्हणून 5 टप्प्यांत निवडणुका घेणं भाजपच्याच अंगलट; भास्कर जाधवांचा आकडेवारी सांगत मोठा खुलासा

Maharashtra Phase 5 Elections: "मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात मतदान झालेलं पाहिलं नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी वेळ मिळावा म्हणून..."
Published on

Bhaskar Jadhav On Narendra Modi : महाराष्ट्रात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. हा राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात मतदान सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात घेण्याची भाजपची रणनीती फसली असल्याचं म्हटलं आहे. शिवाय या निवडणुकीत भाजपला केवळ 150 जागांवर मिळतील तर इंडिया आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात मतदान झालेलं पाहिलं नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी वेळ मिळावा, यासाठी 5 टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु, पाच टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्यामुळे मतदान लांबलं आणि लांबलेलं मतदान भाजपच्या विरोधात गेलं आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर भाजपने राज्यात 45 पारची भाषा बंद केली असल्याचं जाधव म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपची (BJP) भाषणाची आणि प्रचाराची पातळी खालावत गेली. त्यांचा प्रचार भरकटला ते विषयाला धरुन बोलले नाहीत. त्यांच्या भाषेमुळे राज्यातील जनता दुखावली गेली आणि या सगळयामुळे भाजपला 5 टप्प्यात निवडणूक घेण्याचा फायदा होईल, असं वाटले होतं. परंतु, भाजपचं हे गणित फसलं असल्याचंही जाधव म्हणाले.

Bhaskar Jadhav, Narendra Modi
Thane Election Voting LIVE: बोगस मतदानासाठी लोक आणून ठेवलेत; ठाकरे गटाचे उमेदवार भडकले

इंडिया आघाडी 350 पार

तसेच काही गोपनीय सर्व्हेनुसार भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 150 जागांचा आकडाही पार करणार नाही. त्यामुळे चारशे सोडाच पण यांना 150 चा आकडा ओलांडता येणार नाही. तर इंडिया आघाडी मात्र लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता जाधवांच्या या वक्तव्यावर युतीकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com