New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Voting Updates ) पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान झाले आहे. देशातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघात मतदान होत आहे. पहिल्या चार टप्प्यांप्रमाणे पाचव्या टप्प्यातही महाराष्ट्र देशात पिछाडीवर आहे. राज्यात सहा तासांत केवळ 27 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक 52 टक्के मतदान लडाख मतदारसंघात झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदारांना (Voting) आवाहन केले आहे. पहिल्या चार ट्प्प्यांतील मतदानाची टक्केवारी अनेक मतदारसंघात कमी होती. त्यामुळे अनेकांनी चिंताही व्यक्त केली. हीच स्थिती पाचव्या टप्प्यातही कायम राहणार असल्याचे दिसते. (Latest Political News)
प्रामुख्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदान देशपातळीवर सरासरी मतदानापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. पाचव्या टप्प्यांत दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 27.78 टक्के मतदान झाले आहे. देशात महाराष्ट्र तळाला राहिले आहे. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक 52.02 टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील टक्केवारी 48.4 एवढी आहे. मागील चार टप्प्यांतही बंगालमधील टक्केवारी अधिकार होती. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बारामुल्ला मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 34.79 टक्के मतदान झाले असून मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, पहिल्या चार टप्प्यांमध्ये सरासरी 66.95 टक्के मतदान जाले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, बंगालमधील सात, बिहार आणि ओडिशातील प्रत्येकी पाच, झारखंडमध्ये तीन तर लडाख व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होत आहे. (Lok Sabha Election 2024)
देशात पाचव्या टप्प्यात अनेक हायप्रोफाईल लढती होत आहेत. रायबरेलीत राहुल गांधी (Rahul Gandhi), अमेठीत स्मृती इराणी, लखनौमध्ये राजनाथ सिंह यासंह पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, चिराग पासवान, भारती पवार, कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.