India Alliance : ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर ‘इंडिया’चे धाबे दणाणले; आता घातल्या पायघड्या...

Jairam Ramesh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी चर्चेत मार्ग काढला जाईल, असे म्हटलं आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama
Published on
Updated on

Congress : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा धक्का दिला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. ममतांच्या या भूमिकेनंतर काँग्रेससह आघाडीतील पक्षांनी सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर त्यांच्यासाठी जणू पायघड्याच घातल्या आहेत.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी मीडियाशी बोलताना बंगालमध्ये (West Bengal) स्वबळावर लोकसभेची निवडणूक (LokSabha Election) लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसला (Congress) जागावाटपाचे अनेकदा प्रस्ताव पाठवूनही मान्य करण्यात आले नाहीत. त्यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये आम्हीच भाजपचा (BJP) पराभव करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहेत.

Mamata Banerjee
India Alliance : ‘इंडिया’मध्ये फूट? जागावाटप सुरू असतानाच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

इंडिया आघाडीमध्ये ममतांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहे. पण सर्व पक्षांतील नेत्यांनी सावध भूमिका घेत ममतांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. जयराम रमेश म्हणाले, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य मी वाचले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, आम्हाला भाजपला हरवायचे आहे. त्यासाठी एकही पाऊल मागे घेणार नाही. त्याच भावनेतून आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करीत आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खूप लांबचा प्रवास असेल तर कधी कधी रस्त्यात स्पीडब्रेकर येतात. लाल दिवा येतो, याचा अर्थ प्रवास थांबवायचा नसतो. अडथळे पार करून पुढे जायचे असते. कालही असाच प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. टीएमसी आणि ममता या इंडिया आघाडीच्या महत्त्वाचा स्तंभ असल्याचे ते म्हणाले होते. आम्ही ममतांशिवाय आघाडीची कल्पनाही करू शकत नाही, असे म्हणत जयराम रमेश यांनी ममतांचे आघाडीतील महत्त्व अधोरेखित केले.

भाजपला हरवणे आमचे प्राधान्य आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, सध्या सुरू असलेल्या चर्चेतून मार्ग काढला जाईल. बंगालमध्ये आघाडी म्हणूनच आम्ही लोकसभा निवडणूक लढवू, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. भारत जोडो न्याय यात्रा उद्या बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. पण या यात्रेबाबत आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचे सांगत ममतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरही जयराम रमेश यांनी आघाडीतील सर्व नेत्यांशी मल्लिकार्जुन खर्गे बोलले असल्याचे सांगितले.

R...

Mamata Banerjee
I.N.D.I.A Alliance : महिला असूनही ‘इंडिया’त ममता ‘न्याय’ पासून वंचित !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com