India Alliance : ‘इंडिया’मध्ये फूट? जागावाटप सुरू असतानाच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये कुणाशीही आघाडी करणार नसल्याचे ममतांचे संकेत...
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून सर्व विरोधी पक्षांना एकत्रित केले जात आहे. विविध राज्यांमध्ये संबंधित पक्षांसोबत जागावाटपाची चर्चाही सुरू आहे. पण त्याआधीच आघाडीत फूट पडल्याचे संकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. आपण काँग्रेसला दिलेले जागावाटपाचे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ममतांनी बुधवारी मीडियाशी बोलताना बंगालमध्ये (West Bengal) आपण एकटेच भाजपला (BJP) हरवू शकतो, असे स्पष्ट करीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे बंगालमध्ये तरी त्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का असून आता काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. (India Alliance for Lok Sabha Election 2024)

Mamata Banerjee
Karpoori Thakur : कर्पूरी ठाकूर यांना हायजॅक करीत भाजपचा नितीशकुमारांना चेकमेट!

आम्ही दिलेले सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे ममतांनी (Mamata Banerjee) जाहीर केले. कालच त्यांच्यावर काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी सडकून टीका केली होती. ममता या संधीसाधू आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवेल, असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ममतांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीत खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे इंडियाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये काँग्रेस (Congress) व तृणमूल काँग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून कालच नेते टीका करीत असले तरी त्याचा आघाडीवर परिणाम होणार नाही, असे म्हटले होते.

दरम्यान, काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमधूनही जाणार आहे. पण त्याची काहीच माहिती आपल्याला दिली नसल्याचा दावाही ममतांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाल्याचे आता स्पष्ट आहे. पण त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. आपण इंडिया आघाडीचाच भाग असल्याचेही त्या म्हणत आहेत. त्यामुळे ‘इंडिया’बाबत संभ्रम वाढला आहे.  

R...

Mamata Banerjee
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 16 एप्रिलचा मुहूर्त? देशभर चर्चांना उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com