Lok Sabha Election 2024 : पप्पू यादवांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; ‘इंडिया’ची ताकद वाढली...

Pappu Yadav News : पप्पू यादव यांनी 2015 मध्ये जन अधिकार पक्षाची स्थापना केली होती. आधी ते राष्ट्रीय जनता दलामध्ये होते. बिहारमधील दिग्गज नेत्यांमध्ये यादव यांचा समावेश आहे.
Pappu Yadav
Pappu YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारमध्ये काँग्रेसला मोठं बळ मिळाले आहे. दिग्गज नेते पप्पू यादव यांनी आपला जन अधिकार पक्ष आज काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर इंडिया आघाडीची ताकद वाढली आहे. पप्पू यादव हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला होता.

पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन करण्याचे संकेत दिले होते. त्यांना काँग्रेसकडून पूर्णिया मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. मंगळवारी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि तेजस्वी यादव (Tejashvi Yadav) यांची भेट घेतली होती. नवीन पक्ष स्थापन करण्यापूर्वी ते राजदमध्ये होते.

Pappu Yadav
Lok Sabha Election 2024 : राज्यपाल नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना! ‘हा’ पक्ष करणार थेट घटनेत बदल

पप्पू यादव यांची पत्नी रंजित रंजन या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आहेत. यापूर्वी त्या सुपौल लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. मागील काही दिवसांपासून पप्पू यादव काँग्रेसच्या संपर्कात होते. आज त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमध्ये राजद (RJD) आणि काँग्रेसची आघाडी आहे. दोन्ही पक्षांचे राज्यातील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पुढील एक-दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा होऊ शकते. आता पप्पू यादव यांच्या काँग्रेस प्रवेशाने इंडिया आघाडीची (India Alliance) ताकद वाढली आहे. त्यांचा मधेपुरा, पूर्णिया यांसह लगतच्या मतदारसंघांमध्ये दबदबा आहे. त्यामुळे याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो.

पाच वेळा खासदार, एकदा आमदार

प्पपू यादव एकदा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिले आहेत. सुरुवातीला ते राजदमध्ये होते, पण 2015 मध्ये त्यांनी जन अधिकार पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 2019 मध्ये मधेपुरा मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीवेळी त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्यावर 31 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. एका हत्येप्रकरणी त्यांना शिक्षाही झाली होती, पण हायकोर्टाने त्यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.    

R 

Pappu Yadav
Lok Sabha Election 2024 : कार्यकर्त्यांनो कामाला लागा, अधिसूचना जारी; महाराष्ट्रात ‘या’ मतदारसंघात रणधुमाळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com