Hema Malini News : मी भगवान श्रीकृष्णाची ‘गोपी’; हेमा मालिनी असं का म्हणाल्या?

Lok Sabha Election 2024 : हेमा मालिनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्या या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत.
Hema Malini
Hema MaliniSarkarnama
Published on
Updated on

Mathura News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवारांकडून अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. तशा तक्रारीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपtर्वीच काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपच्या खासदार व मथुरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमा मालिनी (Hema Malini News) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाईही केली आहे. आता हेमा मालिनी यांनी आपण स्वत:ला भगवान श्रीकृष्णाची गोपी मानत असल्याचे वक्तव्य केले आहे.

प्रचारादरम्यान मीडियाशी बोलताना हेमा मालिनी यांनी बुधवारी हे वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, मी स्वत:ला भगवान कृष्णाची गोपी मानते. मी नाव कमावण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी राजकारणात (Politics) आलेले नाही. कोणत्याही भौतिक फायद्यासाठी आलेले नाही. भगवान श्रीकृष्ण येथील लोकांवर प्रेम करतात. त्या सर्व लोकांची सेवा केली तर माझ्यावरही त्यांची कृपा राहील.

Hema Malini
Arvind Kejriwal News : जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये ‘शुगर डिप्लोमसी’; ED ने थेट कोर्टात केला मोठा दावा...

मी आता मथुरावासीयांची सेवा करत आहे. येथील परिक्रमा सुखद आणि आकर्षक व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ती आपली प्राथमिकता असेल. त्यासाठी 11 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात्रेकरूंना सर्व सुविधा मिळाल्यात, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षण वाढवे, यासाठी आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्वासन हेमा मालिनी यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नमामी गंगा योजना सुरू होण्यापूर्वीच आपण गंगा आणि यमुना नदीतील प्रदूषणाबाबत संसदेत (Parliament) आवाज उठवल्याचा दावा करत हेमा मालिनी म्हणाल्या, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या योजनेत लक्ष घातल्यापासून प्रयागराजमध्ये गंगेचं पाणी प्रदूषणमुक्त झाले आहे. पण दिल्ली सरकारने यमुना नदीकडे दुर्लक्ष केल्याने ही पवित्र नदी मथुरेत प्रदूषित बनली आहे, असेही त्या म्हणाल्या.

दिल्ली आणि हरियाणातील गटाराचे पाणी यमुना नदीत सोडले जाते. स्वच्छ यमुना नदीसाठी आता आपण सर्व तऱ्हेने प्रयत्न करणार असल्याचे हेमा मालिनी म्हणाल्या. दरम्यान, हेमा मालिनी सलग तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. मागील निवडणुकीतही त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.   

R

Hema Malini
Lok Sabha Election News : लालूंसमोरच त्यांच्या मुलीच्या पराभवासाठी पक्षातील नेत्याकडून प्रचार; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com