Lok Sabha Election 2024 : नवा भिडू मिळाल्याने बिहारमध्ये वाढली ‘इंडिया’ची ताकद

India Alliance : मुकेश सहनी यांचा विकासशी इन्सान पक्ष आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात आघाडीला काहीसा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.
Tejashwi Yadav Mukesh Sahani
Tejashwi Yadav Mukesh SahaniSarkarnama

Bihar News : बिहार लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) इंडिया आघाडीसाठी खूष खबर आहे. आघाडीला राज्यात नवा भिडू मिळाला आहे. मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पक्षाने आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात आघाडीचा ताकद वाढली आहे. राष्ट्रीय जनता दलाने आपल्या कोट्यातून या पक्षाला लोकसभेच्या तीन जागा देऊ केल्या आहेत.

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची घोषणा केली. राज्यात लोकसभेच्या 40 जागा असून, आघाडीत आरजेडीच्या (RJD) वाट्याला २६ जागा आल्या आहेत. त्यापैकीच तीन जागा मुकेश सहनी यांच्या पक्षाला दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये गोपालगंज, झंझारपूर आणि मोतिहारी या मतदारसंघांचा समावेश आहे.

Tejashwi Yadav Mukesh Sahani
LokSabha Election 2024 : देशाला सात पंतप्रधान देणारे शहर; दहा वर्षांपासून भाजपचा कब्जा...

आघाडीविषयी यादव म्हणाले, मुकेश सहनी (Mukesh sahani) यांनी आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी खूप संघर्ष केला आहे. भाजपने (BJP) त्यांच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला. हे सर्वांनी पाहिले. जे लोक 400 पारचा नारा देत आहेत, त्यांना बिहारची जनता धूळ चारेल. या वेळी बिहारमध्ये आश्चर्यकारक निकाल येतील, अशी आशा यादव यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, बिहारमध्ये (Bihar Political News) जेडीयू आणि भाजपसह चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष एनडीएमध्ये आहे. एनडीएमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढवत आहे, तर चिराग यांना पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र, कालच त्यांच्या पक्षातील 22 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. चिराग यांनी लोकसभेची तिकिटे विकल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.

चिराग यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आघाडीला चिराग यांच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात प्राबल्य होणार आहे. आज मुकेश सहनी यांच्या पक्षानेही आघाडीत प्रवेश केला आहे. त्यांची राज्याच्या काही भागात ताकद आहे. त्याचा एकत्रित फायदा आघाडीला होणार आहे. त्यामुळे काही मतदारसंघातील लढतींमध्ये संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

R

Tejashwi Yadav Mukesh Sahani
Congress Manifesto News : आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा हटवणार, नोकरीत महिलांना निम्मा वाटा..! ही आश्वासने मिळवून देणार काँग्रेसला सत्ता?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com