LokSabha Election 2024 : देशाला सात पंतप्रधान देणारे शहर; दहा वर्षांपासून भाजपचा कब्जा...

Prime Minister News : पंडित नेहरूंसह लालबहादूर शास्त्री, विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासह सात पंतप्रधानांचा प्रयागराजशी थेट संबंध आहे. त्यामुळे या शहराला पंतप्रधानांचे शहर म्हटले जाते.
Lal Bahadur Shastri, Pandit Jawaharlal Nehru, VP Singh
Lal Bahadur Shastri, Pandit Jawaharlal Nehru, VP SinghSarkarnama

Prayagraj News : देशभरात लोकसभा निवडणुकीची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. कुणाची सत्ता येणार, कोण पंतप्रधान होणार हे चार जूनला स्पष्ट होईल. पण प्रत्येक निवडणुकीत देशातील एका शहराची नेहमीच चर्चा असते. कारणही तसेच खास आहे. पंतप्रधानांचे शहर म्हणून या ठिकाणाचा लौकिक आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर देशाच्या सात पंतप्रधानांचा या शहराशी थेट संबंध आहे. सध्या या शहराचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज या शहराची कहाणी लक्षवेधक आहे. प्रयागराजमध्ये एकूण दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. एक अलाहाबाद आणि दुसरे फूलपूर. या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेले तीन नेते पुढे देशाचे पंतप्रधान बनले.

Lal Bahadur Shastri, Pandit Jawaharlal Nehru, VP Singh
Congress Manifesto News : आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा हटवणार, नोकरीत महिलांना निम्मा वाटा..! ही आश्वासने मिळवून देणार काँग्रेसला सत्ता?

सर्वात पहिले म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru). दुसरे नेते लालबहादूर शास्त्री आणि तिसरे विश्वनाथ प्रताप सिंह. तर याव्यतिरिक्त इतर चार नेते असे आहेत, ज्यांच्या या शहरांशी थेट संबंध आला आहे. त्यांनी पुढे जाऊन देशाचे नेतृत्व केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या संगमासाठीही प्रयागराज प्रसिद्ध आहे. त्यानंतर पंतप्रधानांचे शहर म्हणून प्रयागराजला वेगळी ओळख मिळाली. पंडित नेहरू यांचे वडील मोदीलाल नेहरू इथेच राहायचे. येथील आनंद भवन त्यांचे निवासस्थान होते. लालबहादूर शास्त्रीही याच शहरातून निवडणूक जिकंले होते.

नेहरूंशिवाय इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधीही या शहरात राहत होते. पुढे ते दोघेही पंतप्रधान झाले. व्ही. पी. सिंह यांचे शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले. याच शहरातून चंद्रशेखर आणि गुलजारीलाल नंदा यांनी शिक्षण घेतले. तेही पुढे पंतप्रधान बनले. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या शहराशी संबंध असलेले सात नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे.

Lal Bahadur Shastri, Pandit Jawaharlal Nehru, VP Singh
Kangana Ranaut News : ...तेव्हा कंगना रनौतला 'या' व्यक्तीने केली होती पिस्तूल ऑफर; स्वत:च सांगितला किस्सा!

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रयागराज मतदारसंघातून निवडणूक लढवून ती जिंकली होती. समाजवादी नेते जनेश्वर मिश्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हेही या मतदारसंघाचे खासदार होते. मागील दोन निवडणुकांमध्ये अलाहाबाद मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे. रीटा बहुगुणा जोशी विद्यमान खासदार आहेत. 2024 साठी भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. या ऐतिहासिक मतदारसंघात भाजप हॅट्ट्रिक करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

R

Lal Bahadur Shastri, Pandit Jawaharlal Nehru, VP Singh
Arvind Kejriwal News : केजरीवालांविरोधात ईडीचं षडयंत्र! संजय सिंहांनी सांगितली 'क्रोनोलॉजी'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com