Lok Sabha Election 2024 : ‘यूपी’त तिसरी आघाडी; निवडणुकीत कुणाला धक्का देणार?

PDM Nyay Morcha : अखिलेश यादव यांच्यावर नाराज असलेल्या पल्लवी पटेल यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पड एमआयएमला दिली आहे. याचा फटका अखिलेश यांना अधिक बसण्याची शक्यता.  
PDM Nyay Morcha
PDM Nyay MorchaSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात अजूनही राजकीय उलथापालथ सुरूच असून इंडिया आघाडी आणखी एक धक्का बसला आहे. काही दिवसांपर्यंत समाजवादी पक्षासोबत असलेल्या अपना दल (कमेरावादी) पक्षाने एमआयएमच्या साथीने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे अनेक लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सर्वाधिक फटका इंडियाला बसण्याची शक्यता असल्याने आघाडीतील पक्षांचे टेन्शन वाढणार आहे.

अपना दलच्या (Apna Dal) नेत्या व आमदार पल्लवी पटेल (Pallavi Patel) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आज तिसऱ्या आघाडीची घोषणा केली. पीडीएम न्याय मोर्चा (PDM Nyay Morcha) असे या आघाडीला नाव देण्यात आले आहे. पी म्हणजे पिछडा (मागास), डी म्हणजे दलित आणि एम म्हणजे मुस्लिम. या तीन समाजघटकांना राजकारणात (Latest Political News) सन्मान मिळवून देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केल्याचे या नेत्यांनी सांगितले.

PDM Nyay Morcha
India Alliance Rally : गजाआड असलेल्या केजरीवालांची गॅरंटी; महारॅलीत सहा मोठ्या घोषणा...

पीडीएममध्ये प्रगतीशील मानव समाज पार्टीसह इतर काही छोटे पक्षांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पटेल यांचा पक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबत होता. पण राज्यसभा निवडणुकीपासून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर पटेल यांनी एमआयएमसोबत तिसरी आघाडी स्थापन करत अखिलेश यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाजवादी पक्षही (Samajwadi Party) पीडीएमच्या मुद्यावर सातत्याने आक्रमक होतो. आता पटेल यांनी हाच मुद्दा हायजॅक करत त्यांना धक्का दिला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पीडीएमला सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सरकार आणि मुख्य विरोधी पक्षाच्या विरोधात या मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील.

ओवैसी यांनी ही साथ केवळ लोकसभा निवडणूक नाही तर पुढेही कायम राहील, असे स्पष्ट केले. ओवैसी यांनी यापुर्वीच अखिलेश यांच्या पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांना पल्लवी पटेलांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे अखिलेश यांच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

PDM Nyay Morcha
Himanta Biswa Sarma News : निवडणुकीआधीच दुसरं लग्न करा, नाहीतर जेलमध्ये! मुख्यमंत्र्यांचा खासदाराला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com