Lok Sabha Election 2024 : नितीशकुमारांच्या परतण्याने भाजपला कितपत फायदा? प्रशांत किशोर म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : भाजप जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने हरण्याच्या दिशेने..
Lok Sabha Election 2024 :
Lok Sabha Election 2024 : Sarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) अध्यक्ष नितीशकुमार यांचे भाजपप्रणित एनडीएमध्ये पुन्हा एकदा सामील होणे, हा इंडिया आघाडीसाठी सर्वात मोठा धक्का आहे. मात्र यामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत याचा जेडीयूला कितपत फायदा होईल? याची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, "भाजपने नितीशकुमारांना एनडीएत घेऊन, युद्ध हरण्याचा दिशेने पुढे पावलं टाकत आहे. याचा भाजपला अपेक्षित फायदा होणार नाही." (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 :
Latur Congress Meeting : 'नितीशकुमार हे देशातील सर्वात मोठे 'पलटूराम', त्यांचा...'; काँग्रेस नेत्याचा तिखट वार

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, "नितीशकुमार यांच्यासाठी भाजपविरोधी इंडिया आघाडीचा भाग असणे ही मोठी गोष्ट नव्हती. स्वत:च्या क्षमतेवर त्यांना काही दमदारपणे करता आले नाही. पण रणनीतीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीला हा मोठा धक्का आहे. त्यांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये घेऊन भाजप लढाई जिंकण्याची तयारी करत आहे, मात्र ते अप्रत्यक्षपणे लोकसभेची लढाई हरण्याच्या दिशेने जात आहेत. इंडिया आघाडीचं मनोबल तोडण्यासाठीच भाजपने हा जोरदार दणका दिला आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किशोर म्हणाले, "भाजपसाठी नितीशकुमारांच्या या निर्णयाने फार मोठा फायदा होणार नाही, केवळ विरोधकांचं मनोबल तोडण्यासाठीच हा धक्का आहे. भाजप बिहारमध्ये कोणत्याही स्थितीत आघाडी घेणार नाही. इंडिया आघाजीबाबत बोलायचं झाल्यास ही आघाडी खूप आधी होऊ शकली असती. विरोधी पक्षांना माहित होते की, लोकसभा निवडणुका 2024 मध्येच होणार आहेत. जर त्यांनी 2022 किंवा 2021 मध्ये आघाडी केली असती, तर आज स्थिती वेगळी असती. त्यांच्याकडे पुरेसा वेळ राहिला असता." (Latest Political News) (Bihar Political News)

Lok Sabha Election 2024 :
Bihar Politics Live: बिहारच्या राजकारणात ट्विस्ट; BJP ने नितीशकुमार यांच्यासमोर ठेवली 'ही' अट

नितीशकुमार यांनी विक्रम नोंदवत तब्बल नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा बिहारमध्ये 'क्लीन स्वीप' होण्याची शक्यता वर्तवली आहे. किशोर यांनी नितीशकुमारांवर देखील टीका केली, "नितीशकुमार शेवटची राजकीय इनिंग खेळत आहेत. जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे ते आपले सत्ता वाचवण्यासाठी काहीही करू शकतात," असे किशोर म्हणाले. (Nitish Kumar News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com