Srinagar News : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असून श्रीनगरमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाले. 1996 नंतर सर्वाधिक 37.98 टक्के मतदानाची नोंद सोमवारी झाली. विशेष म्हणजे श्रीनगरसह जम्मू-काश्मीरमधील तिन्ही मतदारसंघात भाजपने तीन दशकांनंतर पहिल्यांदाच उमेदवार दिलेले नाहीत.
श्रीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे (JKNC) प्रमुख फारुख अब्दुला (Farooq Abdullah) 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. यावेळी त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीत आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (PDP) उमेदवार वाहिद उर रहमान पारा हे उमेदवार आहेत. (Latest Political News)
जम्मू-काश्मीर अपनी पार्टीने मोहम्मद अशरफ मीर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजपकडून (BJP) उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. आगा रुहुल्ला यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. तर मीर हे भाजपचेच उमेदवार असल्याचा दावा इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे खऱ्याअर्थान ही लढत तिरंगी असल्याचे मानले जात आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्रीनगर मतदारसंघात 1996 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. 1996 मध्ये मतदानाची टक्केवारी 40 हून अधिक होती. विधानसभा मतदारसंघानिहाय मतदान पाहिले तर, चादोरामध्ये 46.60 टक्के, च्रार ए शरीफमध्ये 53.23, गांदेरबल 46.81, कांगण 55.55, खान साहिब 48.05, पुलवामा 39.25 तर शोपियानमध्ये 45.04 टक्के मतदान झाले.
जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu and Kashmir) मोदी सरकारने कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर यंदा पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांमध्येही उत्सुकता होती. निवडणुकीत सर्वच पक्षांकडून ३७० चा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. काल श्रीनगरमध्ये कोणत्याही हिंसक घटना न घडता शांततेत मतदान पार पडले.
श्रीनगर मतदारसंघात 52 हजार 100 काश्मीर विस्थापितांची मतदार म्हणून नोंद आहे. निवडणूक आयोगाने विस्थापितांच्या दिल्ली, जम्मू आणि उधमपूरमधील रिलीफ कॅम्पमध्येही मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. अनेक मतदान केंद्रांमध्ये काश्मीरी पंडितांच्या मतदानासाठी रांगा दिसत होत्या. त्यामुळे निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजुने लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.