Lok Sabha Election 2024 Result Congress Vs BJP : काँग्रेसची स्ट्रॅटेजी अन् खर्गेंचे नवे मित्र कोण? उद्या फैसला

Congress Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi Mallikarjun Kharge : एनडीएला 300 चा आकडा पार करता आलेला नाही, तर इंडिया आघाडीने 230 जागांपर्यंत मजल मारली आहे.
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Mallikarjun Kharge, Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi News : एनडीएने बहुमताचा जादुई आकडा पार केला असला तरी इंडिया आघाडीही आशावादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएतील काही पक्षांना चुचकारण्याचे प्रयत्न आघाडीतून सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसेच नवीन मित्रांच्या भरवशावर काँग्रेसच्या मनात सत्तेच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश उपस्थित होते. यावेळी खर्गेंसह राहुल यांनीही मोदींवर जोरदार निशाणा साधला.

नवे सहकारी मिळणार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिले. ते म्हणाले, नवीन सहकारी जे आम्हाला निवडतील, त्यांच्याशीही चर्चा करून मग बहुमतापर्यंत आम्ही पोहचू की नाही हे ठरेल. सगळ्या स्ट्रॅटेजी इथे बोललो तर मोदी शहाणे होतील, असे टोला खर्गेंनी लगावला.

इंडिया आघाडीची बुधवारी बैठक होणार असल्याचे सांगत राहुल म्हणाले, इंडिया आघाडीतील सहकाऱ्यांची बैठक होईल. बहुमताच्या आकड्यासाठी कमी अंतर आहे, त्यावर आघाडी बैठकीत निर्णय घेईल. सत्तास्थापनेबाबत चर्चा होईल. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्हीही काहीही बोलणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले. सत्तास्थापनेच्या दाव्याबाबत त्यांनी थेट भाष्य केले नाही.

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Chandrabapu Naidu Loksabha Result Analysis : जगनमोहनचा धुव्वा उडवला, विधानसभेत स्वबळावर बहुमत, आता चंद्राबाबूंकडे 'इंडिया'चे लक्ष

आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. इंडिया आघाडीतील सहकाऱ्यांचा आम्ही सन्मान केला. मोदी शाहांनी यंत्रणांना धमकावत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही लढाई घटनात्मक संस्था आणि संविधान वाचवण्यासाठी होती. मोदी, शाह आम्हाला नको, असे देशातील जनतेने सांगितले आहे, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

संविधान वाचवण्याचे काम गरीब जनतेने, शेतकरी, दलित, कामगार, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांनी केले आहे. त्यांचे मी आभार मानतो. काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत असून आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. यूपीने कमाल करून दाखवल्याचेही राहूल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com