Lok Sabha Election 2024 Result : मोदी 350+, राहुल गांधींच्या ‘हाता’ची घडी; पुन्हा भाजपराज?

Lok Sabha Election Update PM Narendra Modi Vs Rahul Gandhi NDA Vs India Alliance : अनेक निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आहेत. 2024 मध्येही हे अंदाज खरे ठरल्यास नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Election Result : देशाची कुणाची सत्ता येणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतील, असं भाकित एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. भाजपला 350 हून जागा आणि काँगेसचा सुपडा साफ होईल, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

एक्झिट पोलमुळे देशात पुन्हा मोदीराजची हवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष सकाळी 8 वाजल्यानंतर ईव्हीएममधून आकडे बाहेर येऊ लागताच हा फुगा फुटणार तर नाही ना, अशीही जोरदार चर्चा आहे. त्यासाठी केवळ काही तास वाट पाहावी लागणार आहे.

मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने सज्ज झाली. देशभरात तुफान प्रचार झाला, एकमेकांवर चिखलफेक झाली. मोदींनी बहुतेक भाषणांमध्ये राहुल गांधींसह काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या भाषणांतील विधाने आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरच बराचवेळ घालवावा लागला.

इंडिया आघाडीतील नेत्यांनी बेरोजगारी, महागाई, अदानी-अंबानी, जीएसटी असे हुकमी एक्के काढत मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. पण एक्झिट पोलमध्ये विरोधकांची बत्ती गुल झाली आहे. अर्थात त्यांनी हे पोल धुडकावून लावले आहेत.

भाजपने 400 पारचा नारा दिला होता. पण बहुतेक एक्झिट पोललमध्ये एनडीएला 360 हून अधिक तर इंडिया आघाडीला जेमतेम 150 ते 175 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास इंडिया आघाडीला मोठा धक्का बसेल. एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेसचे नेते आघाडीला 295 जागांवर ठाम आहेत. त्यामुळे आता एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार की आघाडीचे दावे, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

Narendra Modi, Rahul Gandhi
Election Commmission : आयोगाची ‘हिट’ विकेट’; 2029 च्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा

असे आहेत एक्झिट पोलचे आकडे...

India Today - Axis

एनडीए : 361 - 401

इंडिया आघाडी : 131 - 166

इतर : 8-20

ABP - C Voter

एनडीए : 353 - 383

इंडिया आघाडी : 152 - 182

इतर : 4 -12

Tv 9 Pollstrat

एनडीए : 342

इंडिया आघाडी : 166

इतर : 35

Jan ki Baat

एनडीए : 362 - 392

इंडिया आघाडी : 141 - 161

इतर : 10 - 20

Matrize

एनडीए : 353 - 368

इंडिया आघाडी : 118 - 133

इतर : 43 - 48

D Dynamics

एनडीए : 371

इंडिया आघाडी : 125

इतर : 47

PMARQ

एनडीए : 359

इंडिया आघाडी : 154

इतर : 30

Today's Chanakya

एनडीए : 385 - 415

इंडिया आघाडी : 96 -118

इतर : 27 - 45  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com