Bihar News : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची आणखी एक मुलगी सक्रिय राजकारणात दिमाखात प्रवेश करणार आहे. लालूंसह त्यांच्या पत्नी राबडीदेवी, तेजस्वी आणि तेजप्रताप ही मुले आणि मुलगी मीसा भारती हे आधीपासूनच राजकारणात आहेत. आता या कुटुंबातील आणखी एक सदस्य रोहिणी आचार्य लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरणार आहेत. अनेक वर्षे सिंगापूरमध्ये राहिलेल्या आणि डॉक्टर असलेल्या रोहिणी आता बिहारमध्ये विरोधकांना राजकीय ‘डोस’ देणार आहेत.
सारण लोकसभा मतदारसंघातून भाजपने (BJP) विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात लालूंचा (Lalu Prasad yadav) दबदबा मानला जातो. त्यांनी 1977 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढली होती. ही निवडणूक जिंकत ते संसदेत पोहाेचले होते, तर 2004 च्या निवडणुकीत त्यांनी रुडी यांचा पराभव केला होता. ही त्यांची तिसरी निवडणूक होती. 2009 च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला, पण मागील दोन निवडणुकांमध्ये रुडी यांच्या पाठीशी मतदार उभे राहिले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याच मतदारसंघातून आता रोहिणी यांना तिकीट देत लालू रुडींसमोर आव्हान उभे करणार आहेत. याविषयी रोहिणी म्हणाल्या, मी सिंगापूरमधूनच विरोधकांना नाकीनऊ आणले होते. आता सारणच्या भूमीवर आले असून, येथील लोक मला साथ देतील. येथील मतदार बदलासाठी सज्ज झाले आहेत.
रोहिणी आचार्य या डॉक्टर असून, त्यांनी 2022 मध्ये वडिलांना किडनी दान करत जीवनदान दिले होते. त्यांनी जमशेदपूरमधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथून एमबीबीएसची डिग्री मिळवली आहे. 2002 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या अनेक वर्षे सिंगापूरमध्ये होत्या. आता निवडणुकीसाठी बिहारमध्ये आल्या आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.