Lok Sabha Election 2024 : मायावतींबाबत मौन अन् अखिलेशवर आगपाखड; उत्तर प्रदेश जिंकण्याची भाजपची रणनीती काय?

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 : उत्तप्रदेशात भाजपने धार्मिक मुद्यावर निवडणूक नेली आहे. भाजपने येथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बसपच्या मायावती आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्याकडे चालली आहे. या तिन्ही टप्प्यात देशात सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेश राज्यात 41 जागांवर लढत होईल. उत्तरप्रदेशचे राजकीय वातावरण सत्ताधारी भाजपने पहिल्या चार टप्प्यात ढवळून काढले.

या राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती सत्ताधारी भाजपच्या रडारवर नसल्याचे दिसते. 2019 च्या लोकसभा आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मायावतींवर हल्ला चढवला होता.

त्यातुलनेत आता मात्र सत्ताधारी भाजपने यावेळी मायावतींबाबत मौन बाळगल्याने, युपीतील विरोधकांमध्ये वेगळ्या भाजप आणि मायावतींबाबत वेगळ्या राजकीय समीकारण जुळत असल्याची चर्चा आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होईल. यात 14 मतदारसंघात मतदान होईल. यानंतर सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी 14 आणि सातव्या टप्प्यात एक जूनला 13 मतदारसंघात मतदान होईल. अशा एकूण 41 मतदारसंघात उत्तरप्रदेशात मतदान होईल.

पहिल्या चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात सर्वाधिक उत्तरप्रदेश राज्यात लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात ज्या पक्षाचे सर्वत्र, त्याची दिल्लीत सत्ता, असे राजकीय गणित जुळवले झाले. यासाठी उत्तरप्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा असते. देशात भाजपची सत्ता आहे, ती उत्तरप्रदेशातील राजकीय दबदब्यामुळे!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : आदित्यनाथांना अवघड 'टास्क'; जिथे भाजपला अवघी 5 हजार मते, तिथेच होणार सभा...

उत्तरप्रदेशात सत्ताधारी भाजपचे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजकीय दबदबा असला, तरी विरोधक म्हणून सपा आणि बसपाचे वर्चस्व देखील नाकारता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपने उत्तरप्रदेशात राजकीय वातावरण ढवळून काढण्यास सुरूवात केली आहे. प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा भाजपने तिथे प्रतिष्ठेचा केला आहे.

पहिल्या चार टप्प्यातील मतदानात भाजपने राम मंदिराचा मुद्दा प्रचार सभेत गाजवला. त्यामुळे उत्तप्रदेशात भाजपने धार्मिक मुद्यावर निवडणूक नेली आहे. भाजपने येथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बसपच्या मायावती आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांची युती होती. या निवडणुकीत मायावतीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते तर, अखिलेश यादव यांच्या सरकारवर गुंडगिरीचे आरोप केले होते.

Lok Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश अन् हिमाचलमध्ये 'इंडिया'ला धक्का; कर्नाटकात काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी

या निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत भाजपने मायावतींबाबत मौन बाळगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह स्टार प्रचारकांनी घेतलेल्या सभांमध्ये मायावतींबाबत प्रचार सभांमध्ये मौन बाळगले आहे.

उत्तरप्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी याचे राज्यभस दौरे सुरू आहे. त्यांनी देखील मायावतींवर टीका करण्याचे टाळत आहेत. मायावतींकडून देखील भाजपवर थेट हल्ले होताना दिसत नाही. महागाई, बेरोजगारी, धार्मिक तेढ आदी मुद्यांवर जेवढ्यास-तेवढे मायावती बोलताना दिसत आहेत.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : खासदाराच्या भाजप प्रवेशानंतर बसपामध्ये होणार विस्फोट? मायावती थेट तिकीटावरच बोलल्या...

भाजपने सर्वाधिक लक्ष्य केले आहे ते म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सपाचे अखिलेश यादव यांना! भाजपकडून या दोघा नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सपाचे अखिलेश यादव यांनी प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी निमंत्रण देऊन देखील उपस्थित न राहिल्यावर टीका करताना दिसत आहेत. तुलनेत भाजपने मायावतींबाबत सौम्य भूमिका घेतल्याचे दिसते. मौन बाळगल्याचे दिसते. भाजपचे मायावतींविषयी असलेले मौन आगामी काळात वेगळ्या राजकीय समीकारणांची नांदी असू शकते, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

मायावती चार वेळा होत्या मुख्यमंत्री -

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारणात मायावतींचा आजही दबदबा आहे. मायावती या पहिल्यांदा भाजपच्या मदतीने तीन जून ते 18 ऑक्टोबर 1995 या काळात मुख्यमंत्री झाल्या होत्या. 21 मार्च ते 20 सप्टेंबर 1997 या कालावधीत दुसऱ्यांदा, तीन मे 2002 ते 26 ऑगस्ट 2003 या कालावधीत भाजपच्या पाठिंब्याने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. यानंतर मायावतींनी 13 मे रोजी 2007 मध्ये चौथ्यांदा उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

यावेळी ब्राह्मण समाजाने त्यांना पाठिंबा दिला होता. चार टर्म मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या मायावतींना भाजपने दोनदा पाठिंबा दिला. आता भाजपची उत्तरप्रदेशात विधानसभेत स्वबळावर सत्ता आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. उत्तरप्रदेशात भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. योगी आदित्यनाथ उत्तप्रदेशसह देशात भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com