Lok Sabha Election 2024 : आदित्यनाथांना अवघड 'टास्क'; जिथे भाजपला अवघी 5 हजार मते, तिथेच होणार सभा...

Yogi Adityanath rally In Maharashtra : 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत भाजपला मालेगाव मध्य मतदारसंघातून अवघी 5000 तर काँग्रेसला 1 लाख 33 हजार मते मिळाली होती.
Yogi Adityanath rally In Maharashtra
Yogi Adityanath rally In MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज (दि.17 मे) शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत. आदित्यनाथ यांच्या सभेनेच या प्रचाराची सांगता होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

योगी आदित्यनाथ यांची सभा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा मालेगाव शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या सीमेवर ही सभा होत आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत भाजपला मालेगाव मध्य मतदारसंघातून अवघी 5000 तर काँग्रेसला 1 लाख 33 हजार मते मिळाली होती. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सभेने भाजपला काय लाभ होतो?. त्यांची मते वाढतात की घटतात हा चर्चेचा विषय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Yogi Adityanath rally In Maharashtra
Uddhav Thackeray News : '4 तारखेला फक्त नरेंद्र मोदी राहतील, 'डीमोदीनेशन', उद्धव ठाकरे काय म्हणाले...

मालेगाव बाह्य अर्थात दाभाडी मतदारसंघात भाजपला शिवसेनेशी युती असल्याने आघाडी मिळाली होती. राज्याचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यंदा दादा भुसे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामुळे भाजपच्या धुळे मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी मंत्री भुसे यांच्यावर आहे. त्यामुळे भुसे यांनी भाजपला आघाडी मिळवून देण्याचा चंग बांधला आहे.

Yogi Adityanath rally In Maharashtra
Dhule Constituency 2024 : शोभा बच्छाव यांचा प्रचार जाणीवपूर्वक संथ? ; नेत्यांची तक्रार!

धुळे लोकसभा (LOk Sabha) मतदारसंघात मालेगाव मध्य मतदारसंघात सध्या एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल हे आमदार आहेत. मात्र या पक्षाने यंदा आपला उमेदवार निवडणुकीत दिलेला नाही. त्यामुळे या पक्षाचा लाभ देखील अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस पक्षाला होणार आहे. माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव या धुळे मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे धुळे मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा ते विजयी झाले आहे. या परिस्थितीत यंदा त्यांना काँग्रेसची (Congress) झुंज घ्यावी लागत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची मालेगाव शहराच्या वेशीवरील सभा त्यांच्या मतात वाढ करणार की घट हा चर्चेचा विषय आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com