Uttar Pradesh News : देशात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही सध्या उत्तर प्रदेशात आहे. त्यातच केंद्रीय मंत्री व अमेठीच्या खासदार स्मृती इराणी याही आज मतदारसंघात होत्या. या वेळी त्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा अमेठीतून लढण्याचे आव्हान दिले. (Lok Sabha Election 2024)
रायबरेलीच्या खासदार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असा दावा स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, भाजपकडून आता अमेठीपाठोपाठ रायबरेलीही काँग्रेसच्या हातातून खेचून आणण्याचा दावा केला जात आहे.
स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सोमवारी तसे संकेत दिले. त्या म्हणाल्या, जे लोक अमेठीला सत्ताकेंद्र मानत होते, ते अमेठीत आल्यानंतर लोक फिरकलेही नाहीत. वायनाडमध्ये गेल्यानंतर उत्तर भारतातील विशेषत: अमेठीतील लोकांची समज कमी असल्याचे हा व्यक्ती म्हणाल्याचे लोक विसरले नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत लोकांमध्ये आक्रोश आहे, त्यामुळे रायबरेलीची जागा कुटुंबाला सोडावी लागली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमेठीतील रिकाम्या रस्त्यांवरून हेच दिसते की, राहुल यांची यात्रा अपयशी ठरली आहे. राहुल यांनी अमेठी सोडले आणि अमेठीने त्यांना. आता अखिलेश यादवही त्यांच्यासोबत नाहीत. आम्ही पाच वर्षांत जे काम केले, ते त्यांच्या 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या वेळी आम्ही अमेठीसह रायबरेलीतही विजय मिळवू, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला.
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ रायबरेली मतदारसंघात विजय मिळाला होता. अमेठीमध्ये इराणी यांनी राहुल यांचा तब्बल 55 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. राहुल गांधी सध्या केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी वायनाडमधून निवडणूक न लढता अमेठीतून लढावी, असे आव्हान इराणींनी दिले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.