Omar Abdullah News : वाह भाई वाह! ओमर अब्दुल्लांनी आझादांवर हल्लाबोल करत सगळंच काढलं...

Ghulam Nabi Azad News : अब्दुल्ला पितापुत्र पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना रात्री भेटायचे, असा गौप्यस्फोट आझाद यांनी केला आहे.
Omar Abdullah, Ghulam Nabi Azad
Omar Abdullah, Ghulam Nabi AzadSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुला हे पितापुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना रात्री गुप्तपणे भेटायचे, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. या दाव्यानंतर ओमर अब्दुल्लांनी आझादांना सडेतोड उत्तर देत गंभीर आरोप केले आहेत. (Omar Abdullah News)

आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेला दावा अब्दुल्ला यांनी खोडून काढला आहे. त्यांनी एक्स हँडलवरून प्रत्येक दाव्याला उत्तर देत आझादांवर टीका केली. ओमर यांनी म्हटले आहे की, वाह भाई वाह गुलाम नबी आझाद. जम्मू काश्मीरमधून राज्यसभेच्या (Rajya Sabha) तिकिटासाठी भीक मागणारे गुलाम कुठे आहेत?

Omar Abdullah, Ghulam Nabi Azad
Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांचा धडाका; गँगस्टरच्या भावासह 11 जणांना तिकीट

कलम 370 हटवण्याबाबत अब्दुलांना कल्पना असल्याचा दावाही आझाद यांनी केला होता. त्यावर ओमर म्हणाले, अजूनही आठ महिन्यांपासून आमच्यावर निर्बंध आहेत, पण तुम्ही मुक्त आहात. जम्मू आणि काश्मीरचे एकमेव माजी मुख्यमंत्री पाच ऑगस्टनंतर मुक्त आहेत. माझे वडील खासदार नसल्याने त्यांना सरकारी घरातून बाहेर काढण्यात आले. पण तुम्हाला मंत्र्यांसाठीचा बंगला देण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेत पंतप्रधान तुमच्यासाठी अजूनही रडतात आणि प्रत्येक भाषणात आमच्यावर टीका करतात. पद्म पुरस्कार विसरू नका, ज्यासाठी तुम्ही काँग्रेस सोडायला आणि भाजपला चिनाब खोऱ्यात मदतीसाठी तयार झाला. कोण आझाद आणि कोण गुलाम, हे काळच ठरवेल आणि लोक निर्णय घेतील, अशी टीकाही ओमर अब्दुलांनी केली.

Omar Abdullah, Ghulam Nabi Azad
PM Narendra Modi News : ...तर भगवान श्रीकृष्णावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असते! पंतप्रधान मोदींचं विधान

काय म्हणाले होते आझाद?

अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सने 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपशी (BJP) आघाडी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. अब्दुल्ला पितापुत्र डबल गेम खेळतात, असा आरोपही आझाद यांनी केला. दोघेही सरकार आणि विरोधकांना खूष करण्याचा प्रयत्न करतात, असेही आझाद म्हणाले.

अब्दुल्ला आणि पंतप्रधान मोदींची 3 ऑगस्ट 2019 रोजी भेट झाल्याचा दावा करत आझाद म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याआधी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी दिल्लीत अशी चर्चा होती की, या निर्णयाबाबत अब्दुल्लांना विश्वासात घेतले होते. तसेच नेत्यांना घरात बंदी करून ठेवण्याबाबतही सुचवल्याचा दावा आझाद यांनी केला आहे.

R

Omar Abdullah, Ghulam Nabi Azad
Chandigarh Mayor Election : सुप्रीम कोर्टाचा भाजपला झटका; आधीच्या मतदानावरच निकालाचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com