Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांचा धडाका; गँगस्टरच्या भावासह 11 जणांना तिकीट

Akhilesh Yadav News : अखिलेश यादव यांनी वीस दिवसांपूर्वी सोळा उमेदवारांची यादी जाहीर करत आधीच मोठी आघाडी घेतली आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पक्षाकडून वीस दिवसांपूर्वीच सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. आज आणखी अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी आमदार, गॅंगस्टर मुख्तार अन्सारीच्या भावाचाही समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

इंडिया आघाडीसोबत (India Alliance) अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. त्यानंतरही सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याकडून उमेदवार घोषित केले जात असल्याने राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. अखिलेश या यात्रेत सहभागी होणार की नाहीत, याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यातच उमेदवारांची दुसरी यादी आल्याने दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Akhilesh Yadav
Ghulam Nabi Azad News : अब्दुल्ला पितापुत्रासोबत मोदी-शाहांच्या रात्री गुप्तभेटी; आझादांच्या दाव्यानं नव्या चर्चेला फुटलं तोंड...

आज समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) जाहीर केलेल्या अकरा उमेदवारांमध्ये सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारी याच्या भावाचाही समावेश आहे. अफजाल अन्सारी यांना गाजीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचप्रमाणे शाजहानपूरमध्ये राजेश कश्यप, हरदोईमध्ये उषा वर्मा, मिश्रिखमध्ये रामपाल राजवंशी, मोहनलालगंजमध्ये आर. के. चौधरी, प्रतापगडमध्ये एस. पी. सिंह बघेल, बहराईचमध्ये रमेश गौतम, गोंडामध्य श्रेया वर्मा, चंदौलीमध्ये वीरेंद्र सिंह आणि आंवला मतदारसंघातून नीरज मौर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सपाच्या उमेदवारांची पहिली यादी –

1. संभल - शाफिकुर रहमान बर्क

2. फिरोजाबाद - अक्षय यादव

3. मैनपुरी - डिंपल यादव

4. एटा - देवेश शाक्य

5. बदायू - धर्मेंद्र यादव

6. खीरी - उत्कर्ष वर्मा

7. धौरहरा - आनंद भदौरिया

8. उन्नाव - अनू टंडन

9. लखनऊ - रविदास मेहरोत्रा

10. फर्रुखाबाद - नवल किशोर शाक्य

11. अकबरपूर - राजारामपाल

12. बांदा - शिव शंकर सिंह

13. फैजाबाद - अवधेश प्रसाद

14. आंबेडकरनगर - लालजी वर्मा

15. बस्ती - राम प्रसाद चौधरी

16. गोरखपूर - काजल निषाद

R

Akhilesh Yadav
PM Narendra Modi News : ...तर भगवान श्रीकृष्णावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असते! पंतप्रधान मोदींचं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com