Uttar Pradesh News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांना उद्देशून मोठं विधान केलं आहे. कलियुगात सुदामाने श्रीकृष्णाला पोहे दिले असते, तर भगवान श्रीकृष्णावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले असते आणि मग कोर्टाची ऑर्डर आली असती, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. (PM Narendra Modi News)
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभल येथे कल्की धामचा पायाभरणी सोहळा पार पडला. या वेळी बोलताना मोदींनी हे विधान केलं आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या भाषणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, कृष्णम यांनी सांगितले की, प्रत्येकाकडे देण्यासाठी काही ना काही असते, पण माझ्याकडे काहीच नाही. मी केवळ माझी भावना व्यक्त करत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, बरे झाले माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. नाहीतर जग इतके बदलले आहे की, आजच्या युगात सुदामाने भगवान श्रीकृष्णाला पोहे दिले असते, तर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असता. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली असती. भगवान श्रीकृष्ण भ्रष्टाचार करत होते, असा निकाल आला असता. अशा स्थितीतून आपण जात आहोत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रमोद कृष्णम यांची नुकतीच काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचा धार्मिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. यावर मोदी म्हणाले, मी प्रमोद कृष्णम यांना एक राजकीय व्यक्ती म्हणून फारसा ओळखत नव्हतो, पण त्यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली त्यावेळी समजले की, ते धार्मिक आणि आध्यात्मिक कामांसाठी खूप मेहनत घेत आहेत. कल्की मंदिरासाठी त्यांना आधीच्या सरकारमध्ये मोठी लढाई लढावी लागली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.