Maneka Gandhi News : मेनका गांधींच्या प्रचारात मोदींसह योगींचीही पाठ, तरीही विजयाचा विक्रम करणार?

Lok Sabha Election 2024 : मेनका गांधी आतापर्यंत आठवेळा लोकसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. ही त्यांची नववी निवडणूक आहे. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी विक्रमी ठरणार आहे. सुलतानपूरमधून त्या दुसऱ्यांदा मैदानात आहेत.
Maneka Gandhi Election Campaign
Maneka Gandhi Election CampaignSarkarnama
Published on
Updated on

Sultanpur Constituency News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन हायप्रोफाईल मतदारसंघात मतदान होत आहे. गांधी कुटुंबामुळे या मतदारसंघांना मोठे महत्व आहे. पण अमेठीपासून केवळ तीस किलोमीटर अंतरावरील सुलतानपूर मतदारसंघाच्या निवडणुकीची फारशी चर्चा होताना दिसत नाही. इथेही मेनका गांधी (Maneka Gandhi News) यांच्या रुपाने गांधी कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे.

सुलतानपूर मतदारसंघातून मेनका गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत त्यांनी आठवेळा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जिंकली आहे. ही त्यांची नववी निवडणूक आहे. 67 वर्षीय मेनका गांधी यांनी सहावेळी पिलीभीत मतदारसंघातून आणि एकदा ओनला मतदारसंघातून निवडणूक लढली आहे. (Latest Political News)

Maneka Gandhi Election Campaign
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : देशात 5 वाजेपर्यंत 54.68 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रत सर्वात कमी मतदान

मेनका गांधी या निवडणुकीतही विजयी झाल्यास त्या सर्वाधिक काळ लोकसभेच्या सदस्य राहिलेल्या नेत्यांच्या यादीत जातील. या यादीत मोजकीच नावे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. असे असले तरी त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अद्यापही फिरकले नाहीत. विशेष म्हणजे पुत्र वरुण गांधींनीही (Varun Gandhi) प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. या मतदारसंघासाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. (Latest Marathi News)

मेनका गांधी यांनी एकट्याने प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्या संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक गाव-खेड्यात जाऊन बैठका, सभा घेत आहेत. स्थानिक नेत्यांच्या भरवशावर सुरू असलेल्या त्यांच्या प्रचाराला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. त्यांनी मागील पाच वर्षांत केलेले काम आणि लोकांशी निर्माण केलेल्या नात्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्या ‘माताजी’ म्हणून ओळखल्या जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जातीधर्मापलीकडे जाऊन मेनका गांधी यांनी मतदारसंघात काम केले आहे. याआधी त्यांचे पुत्र वरुण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी तसा चांगलाच परिचयाचा आहे. पण जातीय समीकरणांमुळे त्यांच्यासमोर काहीसे आव्हानही आहे.   

मेनका गांधी यांच्याविरोधात समाजवादी पक्षाने राम भुआल निषाद या निषाद समाजातील नेत्याला उमेदवारी दिली आहे. तर बसपाने उदराज वर्मा यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. निषाद हे आधी भाजपमध्येच होते. त्यानंतर ते सपामध्ये आले. ते बसपामध्ये होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांची बऱ्यापैकी पकड आहे. असे असले तरी मेनका गांधी यांनी केलेले काम आणि प्रचाराच्या झंझावातात ते मागे पडल्याचे दिसते.

Maneka Gandhi Election Campaign
Iran President Ebrahim Raisi : मोठी बातमी : इराणच्या राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com