PM Narendra Modi : मतदान कसं वाढवायचं? ढोल, थाळ्या वाजवण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला सल्ला

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी मंगळवारी आपल्या मतदारसंघात मंगळवारी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
PM Narendra Modi  in Varanasi
PM Narendra Modi in VaranasiSarkarnama
Published on
Updated on

Varanasi Lok Sabha Constituency News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण देश पिंजून काढत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या वाराणसी मतदारसंघावरही त्यांचे बारकाईने लक्ष आहे. मोदींचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, अशी खात्री भाजपला (BJP Politics) आहे. तरीही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी आग्रही आहेत. त्यांनी मतदारसंघातील महिला अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सल्ला दिला आहे.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी मतदारसंघातील महिला कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिलांना आवाहन करताना ते म्हणाले, 25 ते 30 महिलांना एकत्रित करा. ढोल वाजवत, थाळ्या वाजवत, गाणी गात त्यांना मतदान (Voting) केंद्रांवर घेऊन जा. सकाळी दहा वाजेपर्यंत आपण प्रत्येक बुथवर 20 ते 25 असे गट केले तर मतदान वाढले, असा सल्ला मोदींनी दिला. (PM Narendra Modi Constituency)

PM Narendra Modi  in Varanasi
Pawan Singh News : भाजपने दिलेली उमेदवारी नाकारली अन् अपक्ष अर्ज भरला! पवन सिंह यांची हकालपट्टी

वाराणसी (Varanasi Politics) मतदारसंघाचे मतदान अखेरच्या टप्प्यात म्हणजे एक जूनला आहे. मागील दोन निवडणुकीत मोदींनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना धुळ चारली आहे. यावेळी हे मताधिक्य वाढविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी मंगळवारी नारी शक्ती संमेलन आयोजित करण्यात आले होते. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस व समाजवादी पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आरक्षणविरोधी असून मित्रपक्ष असलेली समाजवादी पार्टी कायदा-सुव्यवस्थेबाबत उदासीन आहे. इंडी आघाडीचा मानसिकता नेहमी महिलाविरोधी राहिली आहे. महिला आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. जिथे त्यांचे सरकार असते, तिथे महिलांचे जगणे मुश्किल होते, अशी टीका मोदींनी केली.

वाराणसीतील लोकांना यूपी आणि बिहारमधील जंगलराज माहिती आहे. आमच्या आई-बहिणींना घरातून बाहेर पडणे कठीण होत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना शिक्षण सोडून घरी बसावे लागत होते, असे टीकास्त्र मोदींनी सोडले. मागील दहा वर्षांतील सरकारच्या योजनांबाबतही मोदींनी यावेळी माहिती दिली.

सरकारच्या सामजिक कल्याण योजनांमुळे प्रत्येक कुटुंबाकडे आता खूप साऱ्या पैशांच बचत होत आहे. निवास, मोफत अन्न, आरोग्य, अनुदानित गॅस यामुळे बचत होत आहे. मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच महिला सरकारची धोरणं आणि निर्णयांमध्ये सर्वात पुढे आल्यात आहेत. महिलांशिवाय घर चालू शकत नाही, तर देश कसा चालेल? ही गोष्ट मागील 60 वर्षांतील सरकार असलेल्यांना समजली नाही, अशी टीकाही मोदींनी केली.

PM Narendra Modi  in Varanasi
Devendra Fadnavis News : ठाकरेंनंतर आता केजरीवालांची बारी! देवेंद्र फडणवीसांची तोफ दिल्लीत धडाडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com