Lok Sabha Election : भाजपमध्ये बंडखोरीचे वारे; आमदाराने पक्षाविरोधात थोपटले दंड

BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपचे 350 जागांचे लक्ष्य...
JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
JP Nadda, Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यसभा सदस्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्लॅन आहे. पण उमेदवारी जाहीर होण्याआधीच पक्षात बंडखोरीचे वारेही वाहू लागले आहे. बंडखोरीची पहिली ठिणगी पश्चिम बंगालमध्ये पडली असून आमदाराने पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत.

भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 350 जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांपैकी पश्चिम बंगाल (West Bengal) महत्त्वाचे राज्य मानले जात आहे. पण तिथेच आता बंडखोरीचा आवाज येऊ लागला आहे. दार्जिलिंग हिल्स भागातील भाजपचे आमदार विष्णू प्रसाद शर्मा (Vishnu Prasad Sharma) यांनी थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
Lok Sabha Election : भाजप महिनाभरातच बार उडवून देणार; आचारसंहितेआधीच उमेदवारी याद्या

दार्जिलिंग हिल्स भागातून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवू, असा इशारा शर्मा यांनी दिला आहे. शर्मा हे स्वतंत्र गोरखालँडसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या भागात स्थानिकालाच उमेदवारी देण्याबाबत त्यांचा आग्रह आहे. ही जागा भाजप 2009 पासून जिंकत आली आहे. या भागात भाजपने सतत बाहेरील उमेदवार दिल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘ते येतात, पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढतात, जिंकतात, पण नंतर कधीच दिसत नाहीत. यावेळी आम्हाला चांगला उमेदवार हवा. तो दार्जिलिंग हिल्सचा मुलगा असायला हवा. पक्षाने ही मागणी पूर्ण न केल्यास अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवू. मला दार्जिलिंगच्या जनतेच्या भावनांचा सन्मान करायला हवा,’ असे शर्मा यांनी म्हटले आहे. 

शर्मांच्या इशाऱ्यानंतर पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, पक्षाकडून शर्मांशी चर्चा केली जाईल. आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उमेदवार पक्ष ठरवेल, त्यानुसार आम्हाला त्याचे पालन करावे लागेल.

R...

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
BJP Politics : भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या ‘लाडली बहना’लाच सासुरवास; धक्कादायक माहिती समोर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com