Priyanka Gandhi News: प्रियंका गांधींचे निवडणूक लढवण्याबाबत मोठे विधान; म्हणाल्या, "मी लवकरच..."

Congress Party News: राहुल गांधी रायबरेलीच्या मैदानात उतरल्या असतानाच प्रियांका गांधींनी निवडणुकीच्या मैदानात प्रचारक म्हणून उतरल्या आहेत. प्रियंकांच्या सभेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता काँग्रेस त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पाहू लागले आहे.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi Sarkarnama

Rae Bareli Constituency Election 2024: राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढत असतानाच प्रियंका गांधी यांनी त्यांच्या राजकीय करिअरबाबत मोठी घोषणा केली आहे. वेळ आल्यावर मी देखील लवकरच निवडणुकीच्या मैदानात असेल, असं प्रियांका गांधी यांनी रायबरेलीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. प्रियंका गांधी-वड्रा या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस आहेत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशात न्याय जोडा यात्रा काढली. त्यावेळी या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी प्रियंका गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसमधील काही जुन्या-जाणत्या मंडळीकडून होत होती. गांधी परिवाराने याबाबत संयम बाळगला आहे. देशात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) जातीय द्वेष राजकारणावर महाविकास आघाडी इंडिया एकत्र आली. या इंडिया आघाडीने देशात एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' तयार केला आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केरळच्या वायनाड जागेबाबत निश्चिंत असताना प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केली. परंतु यावर निर्णय घेण्यास उशिर झाल्याचे सांगून राहुल गांधींनीच रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी घेतली. राहुल गांधी रायबरेलीच्या मैदानात उतरल्या असतानाच प्रियंका गांधींनी निवडणुकीच्या मैदानात प्रचारक म्हणून उतरल्या आहेत. प्रियंकांच्या सभेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता काँग्रेस त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पाहू लागले आहे.

प्रियंका गांधी जिथे सभा घेत आहेत, तिथे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ते सभेतील लोकांशी जुळवून घेत आहेत. संभामध्ये बोलताना त्या लोकांची भाषा बोलतात, लोकांना भावनिक साद घालत आहेत. यातून त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी देशासाठी कसे शहीद झाले, हे सांगताना त्या स्वतः सभेतील जमावाला भावनिक पातळीवर नेतात. भाषण करताना त्या अडखळत नाहीत. त्यामुळे प्रियंका यांच्या राजकीय करिअरविषय आता काँग्रेसमध्ये (Congress) उत्सुकता निर्माण झाली आहे.

Priyanka Gandhi
J P Nadda News: काशी-मथुरा मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपची माघार? धार्मिक नव्हे तर 'या' मुद्द्यावर निवडणूक लढवणार; जे.पी. नड्डांचे संकेत

रायबरेलीमध्ये प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना देशाला जाती-धर्मात वाटून न देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. हिंदू विरोधी पक्ष म्हणून आम्हाला हिणवले जाते. पंरतु काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हिंदू धर्मातील सत्य, अहिंसा, सत्यमेव जयते या शिकवणीनुसारच सामोरा गेला आहे. पंडित नेहरू 13 वर्षे तुरुंगात होते. महात्मा गांधींना गोळी मारून मारण्यात आले, तेव्हा त्यांच्या तोंडातील शेवटचा शब्द 'हे राम... हे राम... हे राम...' असा होता. मग आमचा पक्ष हिंदू धर्मविरोध कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Priyanka Gandhi
BJP Vs RSS : भाजपला आता 'आरएसएस'ची गरज नाही; जे.पी. नड्डा नेमके काय म्हणाले?

तसेच ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी नाही. ही निवडणूक जनतेसाठी आहे. मोदींना गांधी परिवाराबद्दल असुया आहे. ती कशामुळे आहे ते माहित नाही. काँग्रेसने अशी लोकशाही बनवली आहे की, त्यामुळे देशात चहावाला पंतप्रधान बनू शकला आणि याचा आनंद आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. निवडणूक लढणार का? प्रश्नाचं उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी सूचक विधान केलं. तशी वेळ आल्यावर निर्णय घेऊ, त्यावेळी मी निवडणुकीच्या मैदानात देखील असेल, असं त्या म्हणाल्या.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com