Lok Sabha Election 2024 : जगनमोहन यांच्याविरोधात दोघी बहिणी मिळून लावणार ताकद

CM Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याविरोधात वाय. वाय. शर्मिला आणि वाय. एस. सुनिता या बहिणी मैदानात उतरणार...
Jagan Mohan Reddy, YS Sunitha, YS Sharmila
Jagan Mohan Reddy, YS Sunitha, YS SharmilaSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील राजकारण आता रेड्डी कुटुंबाभोवतीच फिरू लागले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी महिनाभरापुर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या. आता दोघांमधील वैर चांगलेच वाढले असून शर्मिला यांनी चुलत बहिणीलाही सोबत घेत भावाला खिंडीत गाठण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (Lok Sabha Election 2024)

वाय. एस. शर्मिला (YS Sharmila Reddy) यांनी नुकतीच त्यांची चुलत बहीण वाय. एस. सुनिता रेड्डी (YS Sunitha Reddy) यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच कडप्पा या आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या. जवळपास दोन तास या दोघींची भेट झाली. त्यानंतर त्यांनी त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले. यावेळी सुनिताही सोबत होत्या.

Jagan Mohan Reddy, YS Sunitha, YS Sharmila
Budget 2024 Updates : जय जवान-जय किसान... जय विज्ञाननंतर अन् आता मोदींचाही नवा नारा...

कोण आहेत सुनिता?

सुनिता रेड्डी या माजी खासदार वाय. एस. विवेकानंद यांच्या कन्या आहेत. विवेकानंद यांची 2019 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्या न्यायालयीन लढाई लढत आहेत. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यामध्ये कुटुंबातीलच काही सदस्यांची आरोपी म्हणून नावे आहेत. कडप्पाचे विद्यमान खासदार वाय. एस. अविनाश रेड्डी आणि त्यांचे वडील वाय. एस. भास्कर रेड्डी हे दोघांना आरोपी करण्यात आले होते. भास्कर रेड्डी यांनी नुकताच जामीन मिळाला आहे. त्याविरोधात सुनिता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मधील निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काही दिवस आधी 15 मार्च रोजी विवेकानंद यांची हत्या झाली होती. सीबीआयच्या तपासामध्ये या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले होते. ही हत्या राजकीय हेतूने करण्यात आल्याचे बोलले जाते. अविनाश रेड्डी हे मुख्यमंत्री जगनमोहन (CM Jagan Mohan Reddy) यांच्या पत्नीचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यातूनच त्यांना वायएसआर काँग्रेस पक्षाचे कडप्पा मतदारसंघातून तिकीट मिळाल्याची चर्चा होती.

सुनिता यांनी यापार्श्वभूमीवर अविनाश रेड्डी यांना विरोध करण्यासाठी राजकारणात येण्याची तयारी केली आहे. त्या काँग्रेसमध्ये (Congress) दाखल होत रेड्डी यांना कडप्पा मतदारसंघातून आव्हान देऊ शकतात. त्यामुळेच शर्मिला आणि सुनिता यांच्या भेटीला महत्व आले आहे. रेड्डी हे मुख्यमंत्र्यांचेही नातेवाईक असल्याने एकप्रकारे सुनिता यांना राजकारणात आणत शर्मिला यांच्याकडून भावालाच आव्हान दिले जाईल, असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Jagan Mohan Reddy, YS Sunitha, YS Sharmila
Champai Soren News : बिहारमध्ये सात तासांतच शपथविधी; झारखंडमध्ये 20 तास उलटूनही मिळेना मुख्यमंत्री...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com