Lok Sabha Election : '400 पार' झाल्यास ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी मंदिर, POK वर ताबा... ; भाजप मुख्यमंत्र्यांचा दावा!

CM Himanta Biswa Sarma News : मुघलांनी देशात अनेक कारनामे केले आहेत. त्यापैकी अनेक गोष्टींचा सफाया करणे बाकी आहे, असं इशाराही सरमा यांनी दिला.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSarkarnama

Delhi News : आसामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजपचे बडे नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपला लोकसभेच्या चारशे जागा का जिंकायच्या आहेत, याचं उद्दीष्ट सांगितलं. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री सरमा सहभागी झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या चारशे पारच्या घोषणामागील उद्दीष्ट सांगितलं. (Lok Sabha Election 2024)

यावेळी सरमा म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल. काशीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या जागी भव्य मंदिर उभारले जाईल, असेही ते म्हणाले. याप्रचारसभेला संबोधित करताना ते असेही म्हणाले की, मुघलांनी देशात अनेक कारनामे केले आहेत. त्यापैकी अनेक गोष्टींचा सफाया करणे बाकी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election
Praful Patel News: शिवरायांची ओळख असलेला 'जिरेटोप' प्रफुल पटेलांनी मोदींना दिला भेट; शरद पवार गटाच्या नेत्याचा संताप

पीओके भारताचा भाग असेल -

सरमा पुढे म्हणाले, "काँग्रेस (Congress) सत्तेत असताना असे सांगितले जात होते की, काश्मीर भारतातही आहे आणि पाकिस्तानातही आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचं अविभाज्य भाग आहे, यावर कधी संसदेत चर्चा झाली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येही लोक भारतीय ध्वज घेऊन जाताना दिसत आहेत."

Lok Sabha Election
Brijbhushn Sinh News : दिल्ली हायकोर्टाचा ब्रिजभूषण सिंहांना दणका; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित
Lok Sabha Election
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

"पाकिस्तानने आपलं काश्मीर (Kashmir) ताब्यात घेतलं आहे. तो त्यांनी सक्तीने व्यापलेला भारताचा भाग आहे. ते भारताचे अविभाज्य अंग आहे. गेल्या 7 दिवसांपासून तिथून चित्रे येत आहेत. तिथे रोज निदर्शने होत आहेत आणि तिथले लोक भारताचा झेंडा घेऊन पाकिस्तानचा निषेध करत आहेत. हे पाहून मला वाटते की, ही तर सुरुवात आहे. मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पीओकेही भारताचा होईल," असेही सरमा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com