Rahul Gandhi News : राहुल गांधींनी सांगितला आंध्र प्रदेशमधील 'BJP'चा अर्थ, म्हणाले...

Andhra Pradesh Lok Sabha Elections : 'या' तिन्ही नेत्यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हाती आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Elections 2024 : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी आणि राज्यातील अन्य विरोधी पक्षांवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. भाजप म्हणजे बाबू (तेलगु देसम पार्टी प्रमूख चंद्रबाबू नायडू), जगन आणि पवन(जनसेनेचे संस्थापक पवन कल्याण) आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

कडप्पामधील एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधींनी आरोप केला की, तिन्ही नेत्यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हाती आहे. माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डींचा उल्लेख करत राहुल गांधींनी(Rahul Gandhi) म्हटले की, संपूर्ण आंध्र प्रदेशात राजशेखर रेड्डींची पदयात्रा त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी प्रेरणा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Devaraje Gowda : ... म्हणून प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भाजप नेत्यास झाली अटक!

यावेळी राहुल गांधींनी तिन्ही पक्षांवर निशाणा साधत म्हटले की, आज आंध्र प्रदेशला भारतीय जनता पार्टीची बी टीम चालवत आहे. भाजपच्या बी टीमचा अर्थ आहे, बी म्हणजे बाबू, जे म्हणजे जगन आणि पी म्हणजे पवन. या तिघांचाही रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती आहे. हे नेते मोदींच्या(PM Modi) नियंत्रणात आहे, कारण, त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि अन्य यंत्रणा आहेत.

याचबरोबर राहुल गांधींनी हे म्हटले की, दु:खाची बाब ही आहे की आंध्र प्रदेशाचा जो आवाज दिल्ली ऐकला गेला पाहिजे, तो दाबला गेला आहे. तसेच, राजशेखर रेड्डी हे राजीव गांधींच्या भावाप्रमाणे होते आणि दोघांमध्येही वैयक्तिक संबंध सुद्धा होते, असंही राहुल गांधींनी म्हटलं.

Rahul Gandhi
Lok Sabha Election: आंध्र प्रदेशात मोठी कारवाई; तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त, अपघातामुळे झाला नोटा तस्करीचा पर्दाफाश

आंध्र प्रदेशच्या लोकांना हे माहीत आहे की, वाय एस राजशेखर रेड्डींची विचारधारा कधीच भाजपच्या बाजूने उभा राहण्याची नव्हती. मात्र जगन मोहन रेड्डी भाजपविरोधात एक शब्दही बोलू शकले. खरी गोष्ट तर ही आहे की, जगन हे भाजपविरोधात बोलण्याची इच्छा असली तरी बोलू शकत नाहीत, कारण त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणं सुरू आहेत.

राजशेखर रेड्डींचा कल्याणाचा मार्ग, सामाजिक न्यायाचे राजकारण आज आंध्र प्रदेशात उपलब्ध नाही. उलट आज आंध्र प्रदेशात सूडाचे राजकारण पाहायला मिळत आहे. राजशेखर रेड्डी दिल्लीत आंध्र प्रदेशचा आवाज होते, मात्र आज आंध्र प्रदेशला भाजपची बी टीम चालवत आहे. असी राहुल गांधी यांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com