Loksabha Election 2024 : सध्या देशात गल्लीपासून ते दिल्लपीपर्यंत लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. अनेक मतदारसंघांमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. तर प्रचारही शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपआपल्या उमेदवारांसाठी मतं मागत आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील इंदुरमध्ये काँग्रेस चक्क 'NOTA'साठी मतं मागितल्याचे असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊयात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागचं नेमकं कारण.
मध्य प्रदेशमधील इंदुर मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार तर जाहीर केला होता. मात्र ऐनवेळी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या त्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. एवढच नाहीतर भाजपमध्ये प्रवेशही केला. प्रकरण यावरच थांबल नाहीतर काँग्रेसच्या बदली उमेदवाराने निवडणूक लढविण्याची केलेली याचिकाही उच्च न्यायालयाकडून फेटाळली गेली. यामुळे काँग्रेसला प्रचंड धक्का बसला. दुखावलेल्या काँग्रेसने मग याप्रकरणी आता सत्तारूढ पक्षाला धडा शिकवण्यासाठी NOTA शस्त्राचा वापर करत, यासाठीच मतदान मागितल्याचे सुरू केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मतदारांच्यादृष्टीने मध्य प्रदेशातील सर्वात मोठा मतदारसंघ असणाऱ्या इंदुरमध्ये तब्बल 35 वर्षांपासून(1989) काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. मात्र येथील निवडणुकीत उमेदवारच उभा करता न आल्याचे काँग्रेसबाबत यंदा पहिल्यांदाच घडले आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
तर काँग्रेसने आधी अक्षय कांती बम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच त्यांनी अर्ज मागे घेतला आणि नंतर थेट भाजपमध्येच(BJP) प्रवेश केला, यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली.
यावरही काँग्रेसच्या(Congress) बदली उमेदवाराकडून निवडणूक लढवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली गेली, मात्र ही याचिकाही न्यायालयाकडून फेटाळली गेली. अखेर या सर्व घटनाक्रमामुळे प्रचंड दुखावलेल्या काँग्रेसने या मतदारसंघात सत्ताधारी पार्टीला धडा शिकवण्यासाठी NOTA चिन्हावर मतं मागण्याचा निर्णय़ घेतला. यामुळे आता या ठिकाणी भाजपसमोर अन्य 13 उमेदवारांपेक्षा NOTAचे आवाहन असणार आहे. काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नसल्यने निर्धास्त झालेला भाजप पुन्हा एकदा दक्ष झाला आहे.
इंदुरमध्ये सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी म्हटले की, काँग्रेस इंदुरमध्ये कोणत्याही उमेदवाराचे समर्थन करणार नाही आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी लोकांना NOTA चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.