Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी अन् काँग्रेसमध्ये खडाजंगी; तृणमूल 'इंडिया' आघाडीत परतण्याच्या आशा धूसर...

Lok Sabha Election Of West Bengal : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-डावे आणि भाजपचा पराभव करा...
Lok Sabha Election
Lok Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी 'इंडिया' आघाडीत मित्रपक्षांमधील वाढता दुरावा पुन्हा एकदा उघड केले आहे. काल मंगळवारी (दि.30 जाने.) बंगालच्या उत्तर भागात पदयात्रा काढताना बॅनर्जी यांनी लोकांना तृणमूल काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-डावे आणि भाजपचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे बॅनर्जी आघाडीत परतण्याटे चिन्हे दूर दूर पर्यंत दिसत नाही. (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election
West Bengal News : ममतांच्या गडात होणार मोठी कारवाई? ‘ईडी’ संचालकांनी रातोरात गाठलं बंगाल...

ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या चोप्रा आणि इस्लामपूर अशा त्याच भागातून पदयात्रा काढली, ज्या भागातून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी त्यांच्या भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्र काढली होती. या पदयात्र वेळी बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, “तृणमूल काँग्रेसच राज्यातील लोकांच्या हक्कांसाठी लढत आहे. बंगालमध्ये काँग्रेस-सीपीआय (एम)- भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आपण एकजूट केली पाहिजे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election
CM Mamata Banerjee : ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या; वाहन अपघातात डोक्याला दुखापत

पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख अधीर रंजन चौधरी आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यातच टीका - टिपण्णी होचतच आहे. चौधरी म्हणाले, “अनीश खान (हावडा येथील युवक) याच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणीही आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल, असे दिसते. शाळेतील शिक्षकांना नोकऱ्या न मिळाल्याने लोक कोर्टात गेले. रेशन न मिळाल्याने लोक कोर्टातही गेले. आता न्यायालय सीबीआय आणि ईडीकडून तपासाचे आदेश दिले गेले आहे, असे चौधरी म्हणाले. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने अनेक दिवसांपासून अधीर रंजन चौधरी यांच्यावर दोन्ही पक्षांमधील सौहार्दपूर्ण संबंधांमध्ये तणाव निर्माण केल्याचा आरोप केला आहे. (Latest Political News)

ममता बॅनर्जी सध्या उत्तर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिनाजपूरच्या चोप्रा शहरात 'जोनो संजोग यात्रा' काढली. यानंतर त्यांनी जवळच्या इस्लामपूरमध्ये दुसरी पदयात्राही केली. चोप्रा भागातून जात असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना हात जोडून अभिवादन केले. या भेटीदरम्यान पक्षाचे नेते, महिला आणि लहान मुलांसह स्थानिक लोकांनी त्यांचे स्वागत केले. (Mamata Banerjee News)

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com