Baba Balaknath Viral Video : 'बंगाल- कर्नाटकचे रेशनकार्ड बनवून घ्या'; मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाबांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल!

MP Yogi Baba Balaknath Viral Video News : तुम्हाला राजस्थानात लपायला जागा मिळणार नाही...
Baba Balaknath Viral Video :
Baba Balaknath Viral Video :Sarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांची मोठी यादी तयार झाली आहे. वसुंधरा राजे आणि गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह अर्धा डझन नावांवर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यामध्ये आता राजस्थानच्या तिजारा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार बाबा बालकनाथ यांचीही जोरदार चर्चा आहे. राजस्थानचे योगी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बालकनाथ हे आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले आहेत. (Latest Marathi News)

Baba Balaknath Viral Video :
PM Modi Speech : तेलंगणावरून मोदींचा काँग्रेसला इशारा; राजस्थान, मध्य प्रदेश छत्तीसगडमधील विजयाचे श्रेय दिले नारीशक्तीला

हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आक्रमकपणे बोलणारे नेते बाबा बालकनाथ यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रचारादरम्यान दिलेल्या भाषणातील त्यांची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. बालकनाथ यांचा तो व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे. ते राजस्थानच्या गुंडांना राज्य सोडून जा, अशा इशारा देत आहेत. या व्हिडिओमध्ये बालकनाथ म्हणतात की, 'राजस्थानमधील गुंडांनी बंगाल किंवा कर्नाटक (बिगर भाजप शासित) राज्याचे रेशन कार्ड बनवून घेतले पाहिजे."

Baba Balaknath Viral Video :
Rajasthan Politics : वसुंधराराजे अन् गेहलोत यांचे बुरुज ढासळले; 'होम पिच'वर ओढवली नामुष्की...

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा बालकनाथ म्हणतात, "मला त्या सर्व लोकांना सांगायचे आहे, या गुंडांना आणि बदमाशांना मालमत्तेच्या दलालांना, हे भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांना, तुम्ही तुमचे रेशकार्ड बंगाल आणि कर्नाटक राज्यात बनवा. वेळेत ही गोष्ट करा कारण-भाजपचे सरकार येणार आहे. तुम्हाला राजस्थानात लपायला जागा मिळणार नाही. आमच्या माता-भगिनींचा जाहीरपणे अपमान करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा करून आम्ही राजस्थानच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करू."

सोशल मीडियावर मुख्यमंत्री बनवण्याची मागणी, बाबा ट्रेंडमध्ये -

राजस्थानमधील निवडणुकीचे निकाल आल्यापासून अनेक भाजप समर्थक तरुण आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक सोशल मीडियावर बाबा बालकनाथ यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करू लागले आहेत. रविवारपासून बाबा बालकनाथ सतत ट्रेंडमध्ये आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com