Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीला कॅन्सरपेक्षा भयानक आजार! मोदींनी सांगितली तीन आजारांची नावं

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे बुधवारी सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Uttar Pradesh Political News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल केला जात आहे. बुधवारी त्यांनी इंडिया आघाडीला (India Alliance) कॅन्सरपेक्षा भयानक आजार झाल्याचे विधान केले आहे. हा आजार पसरत राहिला तर देश संपवून टाकेल, असेही मोदींनी म्हटले आहे. मोदींनी प्रचारात पहिल्यांदाच असे विधान केल्याने विरोधकही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे बुधवारी सभा झाली. मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून केवळ दोनच टप्पे उरले आहेत. प्रचारासाठीही जेमतेम आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यामध्ये पहिल्या पाच टप्प्यांप्रमाणेच सहाव्या टप्प्यातही मोदींनी आघाडी घेतल्याचे दिसते. (Latest Political News)

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मतदान कसं वाढवायचं? ढोल, थाळ्या वाजवण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला सल्ला

श्रावस्ती येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले, इंडी आघाडीला कॅन्सरपेक्षा (Cancer) भयानक आजार झाला आहे. हा आजार पसरत राहिला तर संपूर्ण देश संपवून टाकेल. हे तीन आजार देशासाठी कॅन्सरपेक्षा भयानक आहेत. हे आजार म्हणजे, सांप्रदायिकता, जातीयवादी आणि घराणेशाही. (Lok Sabha Election Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या सभांमध्ये कार्यकर्ते व्यासपीठाजवळ येण्यासाठी गोंधळ घालत असल्याचे दिसून आले होते. त्यावरूनही मोदींनी निशाणा साधला. ते म्हणाले, लोक स्टेजवर जात असल्याचा एक व्हिडिओ मला पाहायला मिळाला. त्याची माहिती घेतल्यानंतर असे समजले की, सपा आणि काँग्रेसकडून सभांमध्ये येण्यासाठी लोकांना पैसे दिले जातात. यावेळी पैसे न दिल्याने लोक स्टेरवर चढले, असा टोला मोदींनी लगावला.

मोदी कोणत्याही शाही घराण्यातून आलेला नाही. एका गरीब आईचा मुलगा आहे. मला कुणासाठी काहीही कमवायचे नाही. पण घराणेशाहीने चालणारे पक्ष देशाला पुन्हा अडचणीत आणणार नाहीत, एवढा मजबूत देश करायचा आहे. आता देशात काँग्रेसचे कमजोर सरकार नाही, तर मजबूत सरकार आहे, असेही मोदी म्हणाले.       

PM Narendra Modi
Swati Maliwal News : आरोपी खूप शक्तीशाली, मोठे नेतेही घाबरतात! स्वाती मालीवाल यांचा पुन्हा बाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com