Ambadas Danve News : मुंबईतील कमी मतदानाला कोण जबाबदार? दानवेंचा आयोगावर ठपका!

Mumbai Loksabha Election 2024 : आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली. यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Mumbai Loksabha Election 2024
Mumbai Loksabha Election 2024 Sarkarnama

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदानाचे प्रमाण घसरले. विशेषतः मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात संथ मतदानाबद्दल महाविकास आघाडी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

विरोधातील मतदान होऊ नये म्हणून भाजपने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदान प्रक्रिया संथ करायला लावली, असा आरोप करण्यात आला होता. यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली.


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mumbai Loksabha Election 2024
Amol Kirtikar News : बापासाठी लेक धावला, कारवाईची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंना चांगलंच सुनावलं

मुंबईत पाचव्या टप्प्यात कमी मतदानाला निवडणूक आयोगाची अनागोंदी, निष्काळजीपणा जबाबदार आहे, असा आरोप दानवे यांनी केला.निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांची बदली का करण्यात आली? सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग व पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत निःपक्षपातीपणे उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील हीट अ‍ॅन्ड रन प्रकरणावरूनही त्यांनी पोलिसा आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. पुण्यातील अपघात दुर्घटनेत पुणे पोलीस आयुक्तांनी लावलेल्या कलमांची कसून चौकशी करण्यात यावी. हायफाय रहिवासी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात पब सुरू आहेत. विद्येचे हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख पबचे पुणे होऊ लागली आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असताना त्यांना या पब मालकांकडून विविध 'पॅकेज' पुरविले जाते, असा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला. या आधी अंबादास दानवे यांनी पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अगरवाल याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्र पाठवून केली होती.

Mumbai Loksabha Election 2024
Gajanan Kirtikar News: मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, शिवसेना नेत्याचे CM शिंदेंना पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com