Loksabha Election 2024 : देशभरात आचारसंहिता लागू, सात टप्प्यांत मतदान

Maharashtra Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार निवडणूक, जाणून घ्या कधी कुठं होणार?
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 updates : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेतून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार देशभरात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदानास सुरुवात होणार असून, 4 जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

आज (16 मार्च)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पहिला टप्पा सर्वात मोठा असून, एकाच दिवशी 22 राज्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, छत्तीसगड आणि आसाममध्ये पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Loksabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : बिगुल वाजला; इलेक्शन कमिशनकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम -

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम (Election Dates) जाहीर केला. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे राजीव कुमार म्हणाले. 16 जून रोजी मोदी सरकारचा (Modi Government) कार्यकाळ संपत आहे. देशात जवळपास 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामध्ये 49.7 कोटी पुरुष मतदार आहेत. 10.5 लाख पोलिंग स्टेशन, 55 लाखांहून अधिक ईव्हीएमचा (EVM) वापर केला जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Loksabha Election 2024
lok sabha election voting date : मुंबई, पुणे, ठाण्यासह प्रमुख शहरात 'या' दिवशी होणार मतदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com