Maharashtra
MaharashtraSarkarnama

lok sabha election voting date : मुंबई, पुणे, ठाण्यासह प्रमुख शहरात 'या' दिवशी होणार मतदान

Lok Sabha Election News : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डीमध्ये 13 मे रोजी, तर मुंबई, नाशिक व ठाणे या शहरात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
Published on

Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डीमध्ये 13 मे रोजी तर मुंबई, नाशिक व ठाणे या शहरात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

️चौथा टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड ११ मतदारसंघांत १३ मे रोजी मतदान होणार आहे, तर पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 13 मतदारसंघांत 20 मे रोजी मतदान होणार आहे. (lok sabha election voting date News)

Maharashtra
EC press conference On Elections : लोकसभेसोबतच 'या' राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा! काय आहेत वैशिष्ट्ये?

देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील मतदान 20 एप्रिल आणि सात मे रोजी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे दुपारपासूनच आचारसंहितेची लगबग सुरू झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशातील 543 लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. महाराष्ट्रात ही रणधुमाळी 20 मे रोजी होणार असून, राज्यात पाच टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. देशात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान

  • पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

  • दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

  • तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

  • चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

  • पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

  • R

Maharashtra
Lok Sabha Election 2024 : बिगुल वाजला; इलेक्शन कमिशनकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com